सध्या राज्यात बदलत्या वातावरणामुळे आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत तसेच बदलत्या वातवरनामुळे वायरल इन्फेक्शन होऊन सर्दी खोकला ताप या आजारांचा सामना आपल्याला करावा लागत आहे. तसेच बदलत्या हवामानात टोमॅटोची साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आणि वाढत चालले आहेत. त्यामुळे यापासून वाचायचे असेल तर तुम्हाला हे उपाय करणे खूप गरजेचे आणि आवश्यक सुद्धा आहे.
ओव्याच सेवन फायदेशीर:-
आपल्या किचन म्हणजेच स्वयंपाक घरात आपल्याला ओवा हा नेहमीच पाहायला मिळतो परंतु तुम्हाला माहितेय का ओवा खाल्ल्याने आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर फायदे होतात. आपण दैनंदिन जीवनात ओव्या चा वापर वेगवेगळ्या कामासाठी करतो.
कसा खावा ओवा?
दैनंदिन जीवनात तुम्ही ओव्याचं सेवन वेगवेगळ्या प्रकारे तसेच पदार्थात मिक्स करून करू शकता. तसेच काही हेल्थ एक्सपर्ट ओव्याचा चहा सुद्धा पिण्याचा सल्ला देतात. हा चहा बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याल मध व लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने आपल्या शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील. तसेच वायरल इन्फेक्शन चा धोका टळन्यास मदत होते.
हेही वाचा:-बाप रे! हवेत उडणारी बाईक येतेय तुमच्या भेटीला, किंमत ऐकून व्हाल थक्क
ओवा खाल्ल्याने होणारे फायदे:-
ओवा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक जबरदस्त फायदे होतात. ओव्याचे सेवन केल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वायरल इन्फेक्शन पासून धोका कमी होतो शिवाय सर्दी, खोकला, ताप या सारख्या आजारापासून बचाव होण्यास मदत होते.
हेही वाचा:-राज्यात भाजीपाल्याच्या आवकेत वाढ, मात्र भाज्यांचे भाव स्थिरच.
जर बदलत्या वातावरणात तुम्ही ओव्याचा चहा करून पिला तर तुम्हाला सर्दी आणि खोकला याचा त्रास कधीच होणार नाही शिवाय घसा खवखवणे किंवा दुखत असेल तर तुम्ही ओव्याच्या चहाचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल. तसेच जर का तुम्हाला कफ झाले असतील तर तुम्ही आवश्य ओव्याचे सेवन करा. तसेच ओव्याचे सेवन केल्यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्टतेची सारख्या समस्या कायमच्या दूर होतात. या साठी परोपकारी ओव्याचे सेवन नियमित करणे आपल्या शरीराला फायदेशीर आणि उपयुक्त ठरत असते.
Published on: 19 September 2022, 04:29 IST