Health

आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी बाणवणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी या आपल्या आरोग्यावर फार मोठे मोठे परिणाम करीत असतात. काही गोष्टी तर आपण अगदी सहजपणे करतो.

Updated on 11 June, 2022 9:29 PM IST

 आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी बाणवणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी या आपल्या आरोग्यावर फार मोठे मोठे परिणाम करीत असतात. काही गोष्टी तर आपण अगदी सहजपणे करतो.

परंतु अशा सहजपणे केलेल्या काही गोष्टींचा आपल्या आरोग्यावर कितपत चांगला किंवा वाईट परिणाम होतो हे आपल्याला माहित नसते. परंतु  अशा काही छोट्या गोष्टींची माहिती करून घेणे व आरोग्यासाठी फायद्याच्या गोष्टी अंगी बाणवणे खूप महत्त्वाचे असते.

अगदी आपण दूध पितो ही एक पिण्याचे सामान्य क्रिया आहे. किंबहुना आपण दूध पितो नेमके बसून पितो की उभे राहून पितो याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते म्हणजेच जास्त कोणी विचार करत नाही. परंतु दूध हे उभे राहून प्यावे की खाली बसून, हासुद्धा एक वादाचा विषय होऊ शकतो.

यामध्ये मते मतांतरे असून काहींच्या मते दूध खाली बसून पिणे खूप योग्य आहे तर काहींच्या मते दूध हे उभे राहून पिणे योग्य आहे. त्यामुळेमनात एक प्रकारचा गोंधळ माजतो. पण मनामध्ये अशा प्रकारचा गोंधळ न होऊ देता याबाबतीत तज्ञ नेमके काय म्हणतात? हे आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊ.

नक्की वाचा:जेवणानंतर ही क्रिया पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही अत्यंत उपयोगी

अगोदर दुधाचे फायदे समजून घेऊ

1- दूध हे अनेक पौष्टिक तत्त्वांनी समृद्ध असून दुधामध्ये असलेले कॅल्शिअम शरीरातील हाडांना आणि दातांना खूप मजबूत बनवते.

2- दुधामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असल्याने निरोगी हृदयासाठी उत्तम आहे.

3-दूध पिण्याने मनातील तणाव कमी होतो.कारण यामध्ये असलेल्या सेरोटोनिन आनंदाशी संबंधित असलेले संप्रेरक अर्थात हार्मोन्सचा स्त्राव उत्तेजित करते.

4- दुधाच्या सेवनाने शरीराला नैसर्गिक फॅट मिळतात जे चांगल्या आरोग्याला फायदेशीर आहेत शरीराला  नको असलेली चरबी त्यामुळे वाढत नाही.

नक्की वाचा:महत्वाचे! तुम्ही खरेदी केलेल्या औषध खरे आहे की बनावट अगदी ओळखता येईल 15 सेकंदात

दुधाचे सेवन उभे राहून करावे की बसून?

काही तज्ञांच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, दूध हे सेवन करताना उभे राहून केली पाहिजे. कारण दुधाचे सेवन जर बसून केले तर दूध शरीराच्या अर्ध्याच भागात जाते.

याउलट दुधाचे सेवन उभे राहुन केल्याने दूध संपूर्ण शरीरात पोहोचते त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांना पोषकतत्वे मिळतात.

 बसून दूध पिण्याचे दुष्परिणाम

 जेव्हा दूध बसून केले जाते तेव्हा या द्रव्याचा प्रवाह रोखला जातो आणि तो अन्ननलिकेच्या खालच्या भागात राहतो त्याला सामान्यतः GERD असे म्हटले जाते.

कितीही घाई असली त्यामुळे बऱ्याचदा दूध बसून प्यावे लागते. परंतु दूध पिताना तोंडा बाहेर येणार नाही याची देखील काळजी घ्यावी कारण लहान घोट घेणे खूप महत्त्वाचे असून त्यामुळे पोटाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही व पोटात देखील दुखत नाही.

नक्की वाचा:Health Alert: 'ही'लक्षणे दिसताच ओळखा हृदयविकाराचा धोका,वाचण्यासाठी करा या गोष्टी

English Summary: the proper method of drinking of milk and benifit to health
Published on: 11 June 2022, 09:29 IST