Health

आजकालच्या काळात लोकांना अनेक वेगवेगळ्या आजारांची आणि रोगांची लागण झालेली दिसून येते. याची अनेक वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत. आजारी पडल्यावर बहुतांशी लोक उपचारासाठी दवाखान्यात जातात आणि उपचार करतात डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषध खाऊन बरे सुद्धा होतात. परंतु जास्त प्रमाणात गोळ्या आणि औषधें खाणे सुद्धा आपल्या आरोग्याला घातक असतात. त्यामुळे बरेच लोक रासायनिक औषधांपेक्षा पारंपरिक झाडपाला आणि आयुर्वेदिक औषधें खाण्यास भर देत आहे.

Updated on 22 April, 2022 12:13 PM IST

आजकालच्या काळात लोकांना अनेक वेगवेगळ्या आजारांची आणि रोगांची लागण  झालेली  दिसून  येते. याची  अनेक  वेगवेगळी  कारणे  सुद्धा  आहेत. आजारी पडल्यावर  बहुतांशी  लोक उपचारासाठी दवाखान्यात जातात आणि उपचार करतात डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषध खाऊन बरे  सुद्धा  होतात. परंतु जास्त  प्रमाणात  गोळ्या  आणि  औषधें  खाणे  सुद्धा  आपल्या आरोग्याला घातक असतात. त्यामुळे बरेच लोक रासायनिक औषधांपेक्षा पारंपरिक झाडपाला आणि आयुर्वेदिक औषधें खाण्यास भर देत आहे.

आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर:

आयुर्वेदामध्ये अनेक अश्या वनस्पती आहेत त्याचा उपयोग औषध निर्मिती साठी मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये लिंब, तुळस अश्या अनेक वेगवेगळ्या झाडांचा समावेश आहे. हळदीचे झाड आणि मुळे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आणि उपयुक्त असतात.हळदीमधून मिळणारे कर्क्यूमिन  नावाचे  संयुग  कृत्रिम  शरीरातील  रक्तवाहिन्या  आणि  ऊतकांच्या विकासासाठी खूप आरोग्यदायक आणि फायदेशीर आहे. त्याचबरोबर हळदीच्या औषधी गुणधर्म असलेल्या अनेक अश्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. हळदीमध्ये सापडणाऱ्या कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे गुणधर्म कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये एंजियोजेनेसिस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे यापासून कॅन्सर चा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो. तसेच शरीरातील रक्तवाहिन्या च्या विकासासाठी हळद महत्वाची भूमिका बजावते.

अनेक घरगुती उपचारादरम्यान हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामध्ये जर का एखादी जखम शरीरावर झाली तर त्यावर हळदीचा लेप  दिला  जातो  जेणेकरून  जखम  लवकरात लवकर बरी होते. शिवाय खोकला येत असल्यास दुधामध्ये हळद टाकून पिल्यामुळे खोकला गायब होतो. मधुमेह असलेल्या रुग्णांनी नेहमीच्या औषधांच्या जोडीला आवळा आणि हळदीचे चूर्ण समभाग एकत्र करून अर्धा चमचा पावडर चे नियमितपणे सेवन करावे. कफाचे विकार, जंतुसंसर्ग, घसा खवखवणे, सर्दी यांसारख्या तक्रारींमध्ये हळद आणि दूध दीर्घकाळापर्यंत घ्यावे.

बरीच वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसादने बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो शिवाय चेहऱ्यावर असलेले डाग घालवण्यासाठी हळदीमध्ये बेसन,दूध आणि मसुरीचे पीठ घालावे आणि त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावावा त्यामुळे चेहऱ्यावर असलेले डाग आणि सुरकुत्या नाहीश्या होतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होते.

English Summary: The panacea for vascular development and various ailments is unbelievable.
Published on: 22 April 2022, 12:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)