Health

पावसाळा संपला की हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना वात आणि कफ याचा त्रास जाणवायला लागतो. अशावेळी उष्ण गुणात्मक, शरीरात व त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता निर्माण करणारे तसेच कफनाशक व वातनाशक पदार्थ पोटात गेलेले चांगले असतात.

Updated on 28 December, 2021 5:13 PM IST

पावसाळा संपला की हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना वात आणि कफ याचा त्रास जाणवायला लागतो. अशावेळी उष्ण गुणात्मक, शरीरात व त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता निर्माण करणारे तसेच कफनाशक व वातनाशक पदार्थ पोटात गेलेले चांगले असतात.

त्यामुळे हे गुणधर्म देणारे पदार्थ या दिवसात लाडू किंवा चिक्की  सारख्या पदार्थांमध्ये वापरता येतात. हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे लाडू केले जातात परंतु यामध्ये मेथीचे लाडू चे आरोग्यदायी फायदे जास्त आहेत. या लेखात आपण मेथीचे लाडू चे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊ.

 मेथीचे लाडू आरोग्यासाठी फायदेशीर

मेथीचे लाडू बनवण्यासाठी कणिक, तूप, ड्रायफ्रूट्स या नेहमीच्या पदार्थांना प्रामुख्याने  मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात.

मेथी कडू रसाची असल्याने जंतुनाशक म्हणून उपयोगी पडते. त्यामध्ये डायसोजेनीन नावाचे महत्वाचे तत्व असते. त्यामुळे सुजनाशक आणि जंतुनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. सांध्याची सूज,स्नायूंच्या वेदना,घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. हिवाळ्यामध्ये थंड वातावरणात छातीत कप जमा होतो तसेच सर्दी होणे, हात, पाय आणि कंबर आखडणे अशा तक्रारींवर देखील मेथी उपयुक्त ठरते.

हिवाळ्यात थंडीमुळे केसात होणारा कोंडा दूर करण्यासाठी देखील मेथीचा  उपयोग करता येतो. मेथी मध्ये अ आणि क जीवनसत्व, लोह व कॅल्शियम असते त्यामुळे मेथीथंडीत उत्तम टॉनिकचे काम करते.रक्त वाढवण्यासाठी, रक्त शुद्धीकरणासाठी तसेच हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने  मिळतात. तेव्हा हिवाळ्यात मेथीचे लाडू चा खाण्यात जरूर समावेश करावा. नेहमीच्या स्वयंपाकातमेथीचा अल्पप्रमाणात मी तिचा वापर करता येतो.

English Summary: the laddu of fenugrik is most benificial for health and remedy on cough,headache
Published on: 28 December 2021, 05:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)