आपल्याला जायफळ माहिती आहे. जायफळ याचा वापर हा मसाल्याच्या स्वरूपात जास्त प्रमाणात केला जातो. परंतु या जायफळाचे आरोग्यासाठी अतिशय मोलाचे असे फायदे आहेत. जायफळ मध्ये खूप प्रभावशाली अँटिऑक्सिडंट असतात.
जायफळाचे झाड आणि बिया सुद्धा खूप औषधीयुक्त आहेत.जायफळ हे अँटी इन्फलामेटरी अँटीबॅक्टरियल गुणांनी समृद्ध आहे. तसेच पचनक्रिया शेतीसंबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरत. या लेखात आपण जायफळाच्या आरोग्य दायीफायद्याविषयी माहिती घेणार आहोत.
जायफळाच्या आरोग्यदायी फायदे
- संधीवातामुळे शरीराला असहय्य प्रमाणात वेदना होत असतात.संधीवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे,चमक भरणे, सूज येणे अशावेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो.
- दातांच्या वेदना दूर करण्यासाठी जायफळाचा उपयोग केला जातो.
- सर्दी आणि डोकेदुखी पासून मुक्ती मिळवण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावल्याने फायदा होतो.
- लहान मुलांना कफ झाला असेल किंवा रात्री झोप लागत नसेल तर हालेप उपयोगी पडतो.
- जायफळाच्याअरकामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी होते आणि स्वादुपिंडाचा काम वाढते.
- दररोज जेवण केल्यानंतर जायफळ तुकड्याच्या स्वरूपात किंवा पावडर करून त्याचा वापर केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात व पचनशक्ती वाढविण्याचे काम जायफळ करते.
- जायफळ यामध्ये असलेल्या अंटी बॅक्टेरियल गुणामुळे व्हायरसचा हल्ल्यापासून शरीराचे रक्षण केले जाते. म्हणून जेवणात जायफळाचा वापर केल्याने संक्रमण होण्याची शक्यता कमी असते.
- जायफळाची पावडर कुठल्याही इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावली तर जखम बरी होते.
- जाय फळांमध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे ही गुण असतात. जायफळाचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा दुर्गंध निघून जातो तसं इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो.
- जायफळ मध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन्स असल्यामुळे डोळ्यांशी संबंधित आजारांवर फायदेशीर ठरतात. डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचं काम जायफळ करते तसेच डोळ्यांचे दुखणे, जळजळणे आणि सूज करण्याचे काम जायफळ करते.
- शरीरावर असलेले डाग जात नसतील तर त्यावर जायफळ उगाळून लावल्यास डाग हलके होतात.
टीप – कुठल्या ही आरोग्य विषयक समस्या साठी उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Published on: 25 August 2021, 10:16 IST