Health

आले जे की आपल्या चहामध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे चव येण्यासाठी वापरतो. भारतीय पदार्थात आले हे वापरले जाते जे की फक्त आले चव येण्यासाठी च न्हवे तर आयुर्वेद तसेच होमिओपॅथी मध्ये सुद्धा अगदी शास्त्रीय पद्धतीने आल्याचे आपल्या आरोग्यास चांगले महत्व सांगितले गेले आहे.आल्याचे आपल्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात फायदे आहेत, जसे की आले हे एक विरोधी दाहक तसेच अँटी-ऑक्सिडंट या दोन्ही गुणधर्माचे एक पावरहाऊस आहे जे आपल्या शरीराच्या त्वचेसाठी, आपल्या केसांसाठी आणि शरीरातील अनेक अवयवांना सुद्धा लाभदायक आहे.

Updated on 15 September, 2021 8:17 AM IST

आले जे की आपल्या चहामध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे चव येण्यासाठी वापरतो. भारतीय पदार्थात आले हे वापरले जाते जे की फक्त आले चव येण्यासाठी च न्हवे तर आयुर्वेद तसेच होमिओपॅथी मध्ये सुद्धा अगदी शास्त्रीय पद्धतीने आल्याचे आपल्या आरोग्यास चांगले महत्व सांगितले गेले आहे.आल्याचे आपल्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात फायदे आहेत, जसे की आले हे एक विरोधी दाहक तसेच अँटी-ऑक्सिडंट या दोन्ही गुणधर्माचे एक पावरहाऊस आहे जे आपल्या शरीराच्या त्वचेसाठी, आपल्या केसांसाठी आणि शरीरातील अनेक अवयवांना सुद्धा लाभदायक आहे.

आज आपण आल्याचे उपयोग आपल्या शरीरासाठी काय आहेत ते पाहणार आहोत:

१. वजन कमी करण्यासाठी आल्याचा उपयोग -

आले हे फक्त आपल्या जेवणाची चव उत्तम लागावी यासाठी नाही तर आपले वाढलेले जे वजन आहे ते वजन कमी करण्यासाठी सुद्धा आले हा चांगला पर्याय आहे. तुम्ही जर रोज आल्याचे पाणी म्हणजेच आले पाणी पीत असाल तर ते तुमच्या शरीरास खुप लाभदायक ठरणार आहे जे की त्यामधील सर्व पोषक द्रव्ये तुमच्या शरीरास भेटणार आहेत. या आले पाणी मुळे तुमचू भूक कमी होते म्हणजेच भूक लागत नाही आणि तुमचे वजन सुद्धा कमी होण्यास याची मदत होते.

२. त्वचेसाठी सुद्धा आले खूप लाभदायक -

तुम्ही जर नियमितपणे आले पाणी पीत असाल तर तुमच्या त्वचेला याचा खूप फायदा होणार आहे. आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट जिंजरॉल आहे जे आपल्या शरीरात जे मुक्त राडीकल्स असतात त्या सोबत लढते आणि यामुळे आपली त्वचा फक्त निरोगी च राहत नाही तर आपल्या त्वचेवर चांगल्या प्रकारचा चमकदारपणा सुद्धा येतो. आल्यामध्ये जे दाहक गुणधर्म आहेत ते आपल्या शरीरात असणाऱ्या संसर्गाशी लढतात आणि त्यामुळे आपली त्वचा सुद्धा योग्य आणि निरोगी प्रकारे राहते.

हेही वाचा:जाणून घ्या,मक्याचे कणीस खाल्ल्यास शरीरास होणारे जबरदस्त फायदे

३. मासिक पाळी च्या वेळी त्रास कमी होणे -

मासिक पाळी दरम्यान महिला वर्गाला खूप त्रास होतो त्यावेळी त्याने आले पाणी घेतले तर उत्तमच आहे. एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की मासिक पाळी दरम्यान महिलांना ज्या वेदना तसेच पेटके येतात ते कमी करण्यास आले पाणी ची मदत होते त्यामुळे मासिक पाळी दरम्यान आले पाणी तुम्ही घ्या.

४. शरीरातील कॅलेंस्ट्रॉल ची पातळी कमी प्रमाणात -

आपल्या शरीरात जे खराब प्रकारचे कॅलेंस्ट्रॉल असते त्याची पातळी कमी करण्यास आले पाणी उपयुक्त ठरते. आले  पाण्यामुळे  ह्दयविकार  तसेच  स्ट्रोक  सारख्या  समस्यांचा धोका  कमी होतो.आले पाणी मध्ये अनेक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट ,आल्याच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने आपल्या शरीरात जे  मुक्त राडीकल्स असतात त्याचा सामना करते आणि ह्दयविकार असो किंवा कर्करोग तसेच मधुमेह याचा धोका कमी होतो. तसेच आले पाणी मध्ये पोटॅशियम चे प्रमाण देखील असते आणि पोटॅशियम आपल्या हृदयासाठी तसेच हाडांच्या स्नायूसाठी उपयुक्त ठरते.

५. आले पाणी मध्ये अनेक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट:

आल्याच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने आपल्या शरीरात जे मुक्त राडीकल्स असतात त्याचा सामना करते आणि ह्दयविकार असो किंवा कर्करोग तसेच मधुमेह याचा धोका कमी होतो. तसेच आले पाणी मध्ये पोटॅशियम चे प्रमाण देखील असते आणि पोटॅशियम आपल्या हृदयासाठी तसेच हाडांच्या स्नायूसाठी उपयुक्त ठरते.

आले पाणी कसे तयार करावे -

सामग्री:

१. ताजे आले.

२. पाणी ३ कप.

३. मध १ चमचा.

कृती:

आले किसून द्या आणि उकळलेल्या पाण्यात ते टाकावे, थोड्या वेळ थंड करण्यास ठेवा आणि त्यामध्ये १ चमचा मध टाका. आले पाणी तयार झाले की तुम्ही ते पिऊ शकता.

English Summary: The health benefits of ginger in your daily diet
Published on: 15 September 2021, 08:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)