Health

कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो.

Updated on 19 May, 2022 6:56 PM IST
कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत.हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न वरचेवर खाल्ल्यामुळे होतो. या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवी पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव मिक्स होऊन अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात.यामध्ये लिवर सुजणे आणि भूक कमी लागणे या समस्या होतात.
कावीळ म्हणजे ज्याला हिंदी मध्ये पिलिया म्हणतात हा आजार लीवर (यकृत) च्या संबंधातील आजार आहे. कावीळ एक साधारण आजार वाटतो पण जर याचे वेळीस उपचार केले गेले नाही तर हे भयंकर रूप धारण करू शकते यामध्ये रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या जीवघेण्या आजारासाठी घरगुती उपाय सांगत आहोत. जे तुमच्या काविळीला बरी करण्यास उत्तमा ठरेल. हा उपचार कावीळ मग तो हेपेटाइटिस A, B, किंवा C किंवा मंग बिलरुबिन, ESR वाढलेले असेल तरीही फायदेशीर राहील.
काविळी पासून सुटका मिळवण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय
शहाळे (हिरवे नारळ) :रोज दिवसातून कमीतकमी 2 शहाळेचे पाणी प्यावे, या नारळाचे ताजे पाणी प्यायचे आहे म्हणजे ते फोडल्यावर लगेच त्याचे पाणी प्यायचे आहे. असे 3-5 दिवस केल्यानंतर तुम्हाला निरोगी झाल्याचा अनुभव येईल. संपूर्ण दिवस त्याला फक्त नारळ पाणी वरच ठेवा. हा उपाय अनेक रुग्णांना फायदेशीर ठरला आहे. लिवर मध्ये होणाऱ्या कोणत्याही आजारासाठी हा प्रयोग निसंकोच केला जाऊ शकतो.
कांदे :कावीळच्या इलाजामध्ये कांद्याला विशेष महत्व आहे. सर्वात पहिले एक कांदा सोलून त्याचे पातळ-पातळ तुकडे करून यामध्ये लिंबू पिळणे त्यानंतर यामध्ये थोडी काळीमिरी पावडर आणि काळे मीठ मिक्स करून दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यामुळे कावीळ लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते.चण्याची डाळ :रात्री झोपण्या अगोदर चण्याच्या डाळीला भिजत ठेवा. पहाटे उठून भिजलेल्या डाळीचे पाणी काढून त्यामध्ये थोडेसे गुळ मिक्स करा. हा उपाय दररोज एक ते दोन आठवडे केल्यामुळे कावीळ बरी होण्यास मदत होते.सुंठ :सुंठ चा वापर करून देखील कावीळचा उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यासाठी सुंठ 10 ग्राम, गुळ 10 ग्राम घ्यावा. ही सामग्री एकत्र करून सकाळी थंड पाण्यासोबत खाण्यामुळे कावीळी पासून सुटका होण्यास मदत होते.
लसून :कावीळी मध्ये लसून देखील फायदेशीर आहे. यासाठी कमीतकमी 4 लसून कुड्या घ्याव्यात आणि त्यांना सोलून त्यांना बारीक वाटावे त्यामध्ये 200 ग्राम दुध टाकावे. आणि रुग्णाने रोज हे खाण्यामुळे कावीळ मुळा सकट संपून जाण्यास मदत होते.चिंच :चिंच रात्री झोपण्या अगोदर पाण्यात भिजत ठेवावी सकाळी चिंच व्यवस्थित पाण्यात पिळून काढावी आणि या पाण्यात थोडी काळीमिरी पावडर आणि थोडे काळेमीठ मिक्स करून प्यावे. दोन आठवडे हे पिण्यामुळे कावीळ ठीक होण्यास मदत होते.मध आणि आवळा रस :एक चमचा मध घ्यावे त्यामध्ये 50 ग्राम ताज्या हिरव्या आवळ्याचा रस मिक्स करून दररोज सकाळी कमीतकमी तीन आठवडे खाण्यामुळे कावीळ पासून सुटका मिळण्यास मदत होते.
English Summary: The following home remedies must be taken as a supportive treatment in case of jaundice
Published on: 19 May 2022, 06:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)