चहा हे एक असे पेय आहे जे जगाच्या कानाकोपऱ्यात सेवन केले जाते. ठिकाण आणि ऋतूमानानुसार चहा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, मात्र प्रत्येक व्यक्तीला दुधाचा कडक चहा आवडतोचं. चहा पिल्याने ताजेपणा तर येतोच शिवाय चहा पिल्याने आपल्या शरीराला देखील अनेक फायदे मिळतात.
चहाचे जादुई आणि औषधी गुणधर्म लक्षात घेता चायनीज आणि जपानी लोकही मोठ्या प्रमाणात चहा पिणे पसंत करत असतात. रोजच चहा पिणारे अनेकजन आहेत मात्र चहा पिणाऱ्या अनेक व्यक्तींना चहाचे फायदे माहीत नसतात आणि ते फक्त चवीसाठी आणि तलप म्हणुन चहा पितात. मात्र नुकतेच एक नवीन संशोधन समोर आल आहे ज्यामध्ये चहाचे फायदे सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत.
हेही वाचा
Health Tips : भाजलेले चणे आरोग्यासाठी आहेत खूपच फायदेशीर; आपल्या आहारात नक्कीच करा याचा समावेश
Health Benifits : काळे द्राक्ष खाल्ली पाहिजे का हिरवी? जाणून घ्या याविषयी
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की चहा मध्ये पॉलीफेनॉल आढळतात. या घटकाचे आपल्या आरोग्याला विविध फायदे मिळतात. चहामध्ये आढळणारे कॅटेचिन्स, थेफ्लाव्हिन्स आणि थेरुबिगिन्स यांसारख्या संयुगेमध्ये अनेक दाहक-विरोधी, कर्करोग-विरोधी आणि कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात, जे आपल्याला विविध मार्गांनी मदत करतात. नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, चहा कर्करोग आणि हृदयाच्या समस्यांशी लढण्यास आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करण्यास मदत करत असते.
असे सांगितले जाते की, चहाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात जे की रक्तातील हानिकारक रेणू बाहेर काढण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. चहा एक असे पेय आहे जे लोक सहज पिऊ शकतात. मित्रांनो संशोधकांच्या मते, जर एखाद्याने चहाचे सेवन केले तर तो निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगू शकतो.
यूएस टी कौन्सिलनुसार, ब्लॅक, ग्रीन आणि हर्बल टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे की आपल्या शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते शिवाय बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते. ऑस्ट्रेलियात केलेल्या एका रिव्यू मध्ये असे आढळून आले की जे लोक दिवसातून 1 ते 5 कप चहा पितात अशा लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो. तसेच कोणतेही गरम पेय तणाव कमी करण्यास मदत करत असते, याशिवाय याच्या सेवणाने सतर्कता वाढते आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होतं असते.
संशोधनात पुढे असे दिसून आले आहे की, दररोज 1 कप चहा पिल्याने स्ट्रोक किंवा हृदयाच्या समस्यांचा धोका 4 टक्क्यांनी कमी होऊ शकतो आणि तरुण लोकांमध्ये मृत्यूचा धोका 1.5 टक्क्यांनी कमी होतो.
मात्र जास्त गरम चहा पिल्याने होऊ शकतो कॅन्सर
याशिवाय संशोधनात असे देखील आढळून आले आहे की फ्लेव्होनॉइड्स आतड्यांमधील विशिष्ट कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. अमेरिकेतील बोस्टन येथील टफ्ट्स युनिव्हर्सिटीचे डॉ. जेफ्री ब्लमबर्ग यांच्या मते, संशोधनात असे दिसून आले आहे की, चहाचा मानवाला अनेक प्रकारे फायदा होतो.
पण दुसर्या अभ्यासात असे उजागर झाले आहे की, गरम चहामुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. अन्ननलिकेचा कर्करोग हा एक कर्करोग आहे जो अन्न पाईपमध्ये कुठेही होऊ शकतो. हा कर्करोग 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये आढळतो. 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक जास्त गरम चहा पितात त्यांना थर्मल इजा होण्याचा धोका असतो आणि कपात चहा पिणे आणि लागलीच चहा पिल्याने लोकांमध्ये अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका असतो.
Published on: 29 April 2022, 10:39 IST