Health

नैराश्य जागतिक (Global health crisis) आरोग्य संकट बनले आहे. सततची धावपळ आणि धकाधकीची जीवन शैली यामुळे नैराश्याचे प्रमाण वादात आहे. नैराश्याच्या सततच्या आणि वाढत्या गंभीर जागतिक संकटाचा सामना करण्यात जग अपयशी ठरत आहे

Updated on 18 February, 2022 3:19 PM IST

नैराश्य जागतिक (Global health crisis) आरोग्य संकट बनले आहे. सततची धावपळ आणि धकाधकीची जीवन शैली यामुळे नैराश्याचे प्रमाण वादात आहे. नैराश्याच्या सततच्या आणि वाढत्या गंभीर जागतिक संकटाचा सामना करण्यात जग अपयशी ठरत आहे, असे लॅन्सेट आणि जागतिक मानसोपचार संघटनेच्या नैराश्यावरील आयोगाने म्हटले आहे.

जगभरातील 5% प्रौढांना दरवर्षी नैराश्याने ग्रासले आहे. मानसिक, सामाजिक आणि आर्थिक संसाधनांचा अभाव आगोदरच आहे. यामुळे राष्ट्रांच्या आर्थिक समृद्धीवर परिणाम होत आहे. नैराश्य टाळण्यासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. कोविड-19 साथीच्या रोगाने अतिरिक्त आव्हाने निर्माण केली आहेत. ज्यामध्ये त्रास, शोक, अनिश्चितता, याशिवाय आरोग्य सेवेपर्यंत मर्यादित प्रवेशामुळे मानसिक आरोग्याची स्थिती बिघडली आहे. यामुळे अनेक लोकांना अडचणीत आणले आहे.

नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी करा हे उपाय

१. सर्व छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींकडे स्वत:चे लक्ष द्या
२. कॉमेडी चित्रपट अथवा शो पाहा
३. आनंद वाटेल अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधा
४. दीर्घ श्वासोच्छवास घ्या
५. दुसऱ्यांना मदत करा
६. चिडचिड करणं टाळा
७. आवडते पदार्थ खा
८. आवडत्या ठिकाणी शॉपिंग करा

जीवनाच्या सर्व टप्प्यावर नैराश्याने ग्रस्त लोक आहेत. या व्यक्तींना पुरेसा पाठिंबा आणि उपचार मिळाल्यास ते बरे होतील. सुदृढ विज्ञान, राजकीय इच्छाशक्ती आणि सामायिक जबाबदारीसह, नैराश्य टाळता येऊ शकते. त्यावर उपचार केले जाऊ शकतात. आपण कुटुंबे, अभ्यासक, धोरणकर्ते आणि नागरी समाज यांना जागरुक केले पाहिजे.

English Summary: Take these remedies to get rid of depression
Published on: 18 February 2022, 03:18 IST