Health

प्रत्येक स्त्रीला आपले केस लांब काळेभोर आणि दाट असावेत असे वाटत असते परंतु रक्तामध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्यास, अपुरी झोप घेण्याची सवय असल्यास, मानसिक ताण तणाव असल्यास, केमिकलयुक्त हेयर प्रोडक्ट वापरल्याने, आंघोळीसाठी जादा क्षार असलेले पाणी वापरल्याने आपले केस विरळ म्हणजेच पातळ होऊ शकतात.

Updated on 18 May, 2022 12:25 PM IST
म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. केस दाट करण्यासाठी घरगुती उपाय.केस दाट करण्यासाठी केसांना तेल लावणे गरजेचे असते. तेल लावल्याने केसांना चमकदारपणा तर येतोच शिवाय केस मजबूत हि होतात. बदाम तेल केसांसाठी उपयुक्त असते. बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असते.केस दाट करण्यासाठी केसांना तीन महिन्यातून एकदा 1 ते 2 इंच ट्रिम करा. ट्रिममुळे केसांना फाटे फुटले असतील तर ते निघून जाऊन केसांची वाढ होईल.
केस दाट करण्यासाठी केसांच्या मुळावर कोरफडाचा गर लावा. अर्धा तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. कोरफड गरामध्ये केसांसाठी आवश्यक असे पोषक तत्व असतात आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
केस दाट करण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कांद्याच्या रसामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस वाढण्यास आणि केस दाट होण्यास मदत मिळते.केस दाट करण्यासाठी 1 कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्याचा रस 
गाळणीच्या साहय्याने गाळून घ्या. नंतर तो रस आपल्या केसांच्या मुळावर लावा.तासभर राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. कांद्याचा रस लावल्याने केसांच्या मुळांना बळकट होण्यास मदत मिळेल. आठवड्यातून एकदा हा उपाय करून बघा.केस दाट करण्यासाठी नारळाचं तेल हा सर्वात चांगला नैसर्गिक घरगुती उपाय आहे. नारळाचं तेल केस तुटण्यापासून वाचवत. शाम्पू करण्याआधी तासभर केसांना नारळाच्या तेलाने मालिश करा. तसेच केस धुण्यासाठी केमिकल युक्त शाम्पू वापरायच्या ऐवजी शिकेकाईचा वापर करा.

केस दाट करण्यासाठी रात्री मुठभर मेथी दाणे भिजायला ठेवा. सकाळी ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये थोडेसे दही मिसळा. आणि हे मिश्रण केसांवर लावा. अर्धा तास राहूद्या त्यानंतर केस कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने केस दाट होण्यास मदत मिळेल.केसांना शाम्पू करण्याआधी तेलाने मालिश करा असं केल्यामुळे केसांना फाटे फुटणार नाहीत आणि कोरडेदेखील होणार नाहीत. तसेच केसांची चांगली वाढ होण्यासाठी दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या. आपल्या आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असू द्या. भाज्या शक्यतो लोखंडी कढईतच करा.

English Summary: Take home remedies to thicken hair instantly and save money
Published on: 18 May 2022, 12:25 IST