Health

उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये आपल्या शरीराचे महत्वाचे अवयव म्हणजे डोळे, उन्हाळ्यात डोळ्यांचे आरोग्य राखणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे, डोळ्यात पाणी येणे आणि डोळे लाल होणे असे प्रकार होतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत. या नियमाबाबत आपण जाणून घेऊया.

Updated on 27 May, 2022 9:41 AM IST

उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये आपल्या शरीराचे महत्वाचे अवयव म्हणजे डोळे, उन्हाळ्यात डोळ्यांचे आरोग्य राखणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे, डोळ्यात पाणी येणे आणि डोळे लाल होणे असे प्रकार होतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत. या नियमाबाबत आपण जाणून घेऊया.

उन्हात जाने टाळा आणि गेलात तर जाताना सनग्लासेस घाला. सनग्लासेस धोकादायक अल्ट्रा व्हायलेट '' आणि अल्ट्रा व्हायलेट 'बी' किरणांना रोखतात. सावलीत उभे असतानाही सनग्लासेस घाला. जर तुम्ही सावलीत उभे असाल तर तुम्ही सुरक्षित आहात असे समजू नका. सावलीतही, तुमच्या डोळ्यांना धूळ किंवा उष्णतेचा त्रास होऊ शकतो. 

जर तुम्ही पॉवर लेन्स वापरत असाल तरनक्कीच सनग्लासेस घाला त्यामुळे अतिनील किरणांमुळे डोळ्यांना त्रास होणार नाही. घराबाहेर पडताना मोठी टोपी घाला. यामुळे सूर्याची किरणे तुमच्या डोळ्यांवर पडण्यापासून वाचतील. उन्हाळ्यात दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत.

डोळे आणि त्वचेचे निर्जलीकरण टाळण्यासाठी दररोज किमान दोन लिटर पाणी प्या. पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांतील स्नेहन कमी होते, ज्यामुळे झीरोफ्थाल्मियासारख्या आजारांचा धोका वाढतो. उन्हाळ्यात डोळे निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि मिनरल्सने युक्त आहार घ्या. यामध्ये गाजर, शेवग्याची भाजी असे पदार्थ डोळ्यासाठी उपयुक्त असतात. प्रत्येक अर्ध्या तासाला ५-१० मिनिटे डोळ्यांना विश्रांती देण्यास विसरू नका.

पूर्ण झोप घ्या. सारखे मोबाईल किंवा कॉम्पुटरकडे पाहू नका. काम करत असताना कधी कधी इकडे तिकडे पाहत जा. डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा. डोळ्यांवर काकडीचे तुकडे किंवा गुलाब पाण्यात भिजवलेला कापसाचा गोळा ठेवा. तुमच्या डोळ्यांच्या मेकअपच्या वस्तू कोणाशीही शेअर करू नका. या टिप्स आपण पाळल्यास आपल्या डोळ्यांना फायदा होईलच. महिन्यातून एकदा डोळे तपासा. हे सर्व करण्याअगोदर आपण वैद्यकीय सल्ला घ्यायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
Pre Mansoon Rain: मान्सूनपूर्व पावसाचे राज्यात थैमान; आता 'या' जिल्ह्यात कोसळणार मान्सूनपूर्व पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
शेतकरी बंधूंसाठी खूपच माहितीपूर्ण! बायोचर आहे जमिनीची सुपीकता अनेक दशके आणि शतके वाढवणारी यंत्रणा

English Summary: Take care of your eyes
Published on: 27 May 2022, 09:41 IST