गेल्या पंधरा दिवसापासून देशामध्येओमायक्रोन रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्या सगळ्या ओमिक्रोन च्या प्रकरणांमध्ये लहान मुलांना देखील याची बाधा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे फार गरजेचे आहे.
ओमीक्रोनचे साधारण स्वरूप
लहान मुलांमध्ये आणि तरुण मुलांमध्ये ओमिक्रोनची अतिशय सौम्य लक्षणे आहेत. ताप, खोकला, घसा खवखवणे आणि घशात दुखणे यासारखी लक्षणे मुलांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत. याबाबतीत तज्ञांनी सांगितले आहे की संसर्ग झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात, पुढे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका फारच कमी होतो.
परंतु लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. आतापर्यंत डेल्टा व्हेरिअन्टचा विचार केला तर लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने त्यांच्यावर कोरोना चा प्रभाव खूपच कमी असल्याचे दिसून आला आहे मात्र कोरोना ची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना हा शरीरातील श्वसन मार्गाची संबंधित आहे. त्यामुळे वृद्ध लोकांवर देखील त्याचा जास्त परिणाम होतो.त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे फार गरजेचे आहे.
त्याचबरोबर लसीकरण हा एक उत्तम स्वतःची सुरक्षितता ठेवण्यासाठीचामार्ग आहे.ओमिक्रोन व्हेरीअन्टहा डेल्टा पेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. परंतु याच्या मुळे बाधित झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे आता आरोग्य यंत्रणाच ओझ देखील हलकझाल आहे.
Published on: 06 January 2022, 10:16 IST