हळद प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातील एक महत्वपूर्ण मसाल्याचा पदार्थ, जसे मिठा विना स्वयंपाक अळणी लागतो अगदी त्याचप्रमाणे हळदी विना स्वयंपाक चवहीन लागतो. मात्र, हळद फक्त चविष्ट मसाल्याचा पदार्थच आहे असे नाही तर हळद अनेक औषधी गुणधर्मांनी देखील भरपूर आहे. हळदी मध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यास, त्वचेस विशेष फायद्याचे ठरतात. हळदीचा उपयोग अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट मध्ये आपणास बघायला मिळेल.
हळदीचा अनेक लोक उटणं म्हणून उपयोग करतात, तर अनेक फेसपॅक देखील हळदीपासून तयार केले जातात. जर आपण पाण्यात हळद टाकून जर स्नान केले तर यामुळे आपल्या आरोग्यास अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात, आज आपण याचा फायद्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
पाण्यात हळद टाकून अंघोळ केल्यास होणारे फायदे- त्वचा चमकदार बनण्यास मदत होते- जर आपणास आपली त्वचा चमकदार बनवायची असेल आणि त्वचेवर ग्लो आणायचा असेल तर आपण आंघोळीच्या पाण्यात हळद टाकू शकता. हळदीत आढळणारे एंटीऑक्सीडेंट आणि anti-inflammatory गुण त्वचेस चमकदार बनवण्यासाठी विशेष फायद्याचे असतात.
त्वचेच्या जखमा भरन्यासाठी रामबाण-त्वचेच्या जखमा भरण्यासाठी अनेक लोक हळदीचा वापर करतात. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन जळजळ आणि ऑक्सिडेशन कमी करून जखमा बरे करण्यास मदत करते. त्यामुळे जर शरीरावर कमी प्रमाणात जखमा असतील तर आपण आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.
सोरायसिसमध्ये फायदेशीर-जर कुणाला सोरायसिसची समस्या असेल तर अशा व्यक्तींनी हळदीच्या पाण्याने अंघोळ करावी यामुळे ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. असे सांगितलं जातं की, हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सोरायसिसची लक्षणे कमी करण्यास विशेष फायद्याचे असल्याचे सांगितलं जाते.
Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा निदान एकदा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.
Published on: 05 March 2022, 04:18 IST