Health

उन्हाळा ऋतू आला की वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते तसेच तापमान वाढल्यामुळे गरमी वाढते त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात सूर्यकिरण सुद्धा खूप प्रखर असतात. तेव्हा आपल्या शरीराला गरज असते ती म्हणजे थंडगार पेयांची.उन्हाळा सुरू झाला की सर्वत्र फळांच्या थंडगार रसाची विक्री सुरू होते.उन्हाळ्यात थंडगार उसाचा रस पिल्यावर लगेच ताजेतवाने वाटते. उन्हाळ्याच्या हंगामात फळांचा थंडगार ज्यूस आपल्या शरीराला गारवा देत असतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या फळांचे ज्यूस मिळतात त्यामध्ये सफरचंद, मोसंबी, संत्री, स्ट्राबेरी, केली, आंबा या फळांचा ज्यूस मिळतो. या व्यतिरिक्त मिळतो तो म्हणजे उसाचा ताजा आणि थंडगार रस. उसाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात तसेच आपल्या शरीराला लाभकारी आणि आरोग्यदायी असतो.

Updated on 15 February, 2022 5:56 PM IST

उसाच्या रसामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीराला फायदेशीर असतात उसाच्या रसामध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस हे सर्व आवश्यक घटक उसामध्ये असतात

काविळीची फायदेशीर:-

कावीळ झालेल्या लोकांना उसाचा रस पिण्याचा सल्ला सर्व डॉक्टर देत असतात. उसाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ज्या लोकांना मधुमेह आहे अश्या व्यक्तींना उसाच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरते. कारण उसाच्या रसामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते.

पचनक्रियेसा तंदुरुस्त आणि मजबूत राहते:-

उसाच्या रसामध्ये पोटॅशियम चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.पोटॅशियम आपल्या पचनक्रियेसाठी आवश्यक असते. शिवाय बुद्धिकोष्टीचा त्रास असल्यास उसाचा रस त्यावर फायदेशीर ठरतो.

कर्करोगावर परिणामी:-

उसामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आढळते जे की कर्करोगाशी लढण्यास आपली मदत करते.

त्वचेसाठी फायदेशीर:-

उसाच्या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचेसंबंधीत असलेल्या सर्व समस्या नाहीश्या होतात तसेच चेहऱ्यावर आलेली पुरळ तसेच काळे डाग नाहीसे होतात. उसाचा रस पिल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

डिहायड्रेशन पासून बचाव:-

उन्हाळ्यात उसाचा रस पिल्यामुळे  डिहायड्रेशन चा धोका नाहीसा होतो. त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस आवश्य प्यावा. उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आणि  बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. यामुळे दातांना होणाऱ्या इनफेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

English Summary: Summer is coming, you will get tired of reading the health benefits of sugarcane juice which is excellent in taste
Published on: 15 February 2022, 05:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)