आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी तर खाल्लीच असेल. शेवग्याची पालेभाजीही अतिशय चविष्ट तसेच आरोग्याला फायदेशीर असते. सहज मिळणाऱ्या भाज्या अत्यंत चविष्ट असतात. सहज मिळणाऱ्या आणि अनेक भाज्यांना पर्याय असलेली भाजी म्हणजे शेवग्याची भाजी. ही भाजी अत्यंत चविष्ट आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असते.
उन्हाळ्याचे शेवटचे १५ दिवस आणि पावसाळ्याचे सुरूवातीचे १५ दिवस असा एक महिन्याचा जो काळ असतो त्याला ‘ऋतुसंधीकाळ’ असे म्हटले जाते. हा काळ स्वास्थ्याच्यादृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. या काळात रानभाज्या तसेच शेवग्याची भाजी खाणे चांगले असते. शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजना मिळून पोट साफ होते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो.
शेवग्याच्या पानात अनेक गुणधर्म असतात, यामध्ये पीट्रिगोस्पेरमिन नावाचे कार्यकारी तत्व असते. ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते. त्यामुळे आतड्यातील व्रणास कारणीभूत असणाऱ्या एच पायलोरी या जीवाणूवर ते प्रभावी ठरते व आंतड्यातील व्रण भरून येण्यास मदत होते. हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस यावर शेवग्याची भाजी गुणकारी असते. शारिरीक आणि मानसिक थकवा या भाजीमुळे कमी होतो. जडपणा या भाजीने कमी होतो.
शेवग्याचा पाला रक्तवर्धक व हाडांना बळकटी देणारा आहे. सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या आजारावर शेवग्याच्या पाल्याची भाजी लाभदायक ठरते. शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधीवातासाठी चांगली आहे. शेंगाची भाजीसुद्धा स्नायूगत संधीवातासाठी तसेच कृमीनाशक आहे. यामुळे आपण अनेक आजारापासून दूर राहू शकतो.
भाजी बनवण्यासाठी शेवग्याचा पाला स्वच्छ धुऊन घ्यावा. नंतर चिरून घ्या. मूग डाळ किंवा इतर कोणतीही डाळ भिजून घ्यावी. जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण वाटून घ्यावा. फोडणी करून वरील सर्व पदार्थ घालून खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व परतावी. परतल्यानंतर त्यात भाजी घालावी, मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू द्यावी. त्यानंतर भाजी खाण्यासाठी तयार असते.
महत्वाच्या बातम्या
Success : टरबूज लागवड केले आणि अवघ्या अडीच महिन्यात मिळवले दहा लाखांचे उत्पन्न
Poultry : कडकनाथने बदलले महिला शेतकऱ्याचे नशीब!! एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करणारी महिला आज बनली मालक
Published on: 28 April 2022, 10:41 IST