परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि थायरॉईडला दूर ठेवायचे असेल तर योग्य झोप महत्वाची आहे.झोपेकरिता मेंदूत मेलॅटोनिन नावाचे हार्मोन तयार होते; परंतु या डोक्यावर लॅपटॉप, मोबाइल, टीव्हीचे किरणे पडली तर ही सर्व प्रक्रिया थांबते.
याउलट मेंदूला अलर्ट ठेवणारा कॅटेकोलामाइन नावाच्या हार्मोनचे उत्सर्जन होते. हा मेलॅटोनिन अप्रत्यक्षरित्या आपल्या थायरॉइडचा मित्र व कॅटेकोलामाइनचा शत्रू आहे.चांगल्या झोपेमुळे आयजीएफ-१ नावाचा हार्मोन तयार होतो. यामुळे आपल्या पेशी पुन्हा नवीन
जोमाने काम करण्यास सज्ज होतात. इन्सुलिनची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. खरे तर रात्रीची चांगली झोप आपल्याला वजन कमी करण्यासाठीही महत्त्वाची ठरते. झोप न झाल्याची भावना असते तेव्हा सकाळी आपण चहा, कॉफी व जास्त
कॅलरीच्या पदार्थांकडे धाव घेतो. यामुळे थायरॉइडचे कार्य तर मंदावतेच, आपला 'वेट लॉस प्रोग्राम'सुद्धा बॅकफुटवर जातो.थायरॉइडचा आजार उद्भवण्यासाठी ॲड्रेनल ग्रंथीदेखील कारणीभूत ठरते. चांगल्या झोपेमुळे या ग्रंथीचे कार्य सुधारते. थायरॉइडला फायदा होतो.
Published on: 16 May 2022, 11:50 IST