Health

कारले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक कारल्याच्या कडूपणामुळे ते आपल्यातील बऱ्याच जणांना खायला देखील आवडत नाही. परंतु जर आपण कारल्याचा विचार केला तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप समृद्ध आहे. जर तुम्ही कारले खात असाल तर तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर पोटासंबंधीच्या तसेच यकृत आणि अस्थमाचा रुग्णांसाठी देखील कारले खूप फायदेशीर आहे. या लेखामध्ये आपण कारल्याचा रस व त्याचे आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 07 October, 2022 5:00 PM IST

कारले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक कारल्याच्या कडूपणामुळे ते आपल्यातील बऱ्याच जणांना खायला देखील आवडत नाही. परंतु जर आपण कारल्याचा  विचार केला तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप समृद्ध आहे.

जर तुम्ही कारले खात असाल तर तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर पोटासंबंधीच्या तसेच यकृत आणि अस्थमाचा रुग्णांसाठी देखील कारले खूप फायदेशीर आहे. या लेखामध्ये आपण कारल्याचा रस व त्याचे आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:Health Tips: सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी अंकुरलेले हरभरे खाण्याचे 'हे' मिळतात जबरदस्त फायदे, वाचा डिटेल्स

 कारल्याच्या पाणी म्हणजे रस पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे

1- पोटाच्या आरोग्यासाठी- कारण यामध्ये असलेल्या  फॉस्फरसचा प्रमाणामुळे बद्धकोष्ठतेचा समस्या दूर होते व पोटातील पाचक एंजाइमचे उत्पादन सुधारते व पचनास देखील मदत होते. त्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न लवकर पचते.

2- लिव्हरसाठी फायदेशीर- कारल्याचा रस हा लिव्हर साठी खूप फायदेशीर असून त्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट लिवर मधील एंजाइम सुधारतात व त्यांचे कार्य गतिमान करतात.

3- त्वचेसाठी लाभदायक- कारल्याचे पाणी म्हणजे रस पिण्यामुळे त्यात असलेल्या अँटी बॅक्टरियल गुणधर्मांमुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम दूर होतात व त्वचेचा संसर्ग असतात त्यावर देखील फायदेशीर आहे.

नक्की वाचा:Health Update: भावांनो! किडनी ठेवायची असेल निरोगी तर आजच सोडा 'या' सवयी, वाचा महत्वपूर्ण माहिती

4- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी- कारल्याचे पाणी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील उपयुक्त असून त्यामध्ये असलेल्या अँटी व्हायरल गुणधर्मामुळे शरीराला अनेक व्हायरल इन्फेक्शन पासून वाचण्याचे काम करते.

एवढेच नाही तर त्यामध्ये असलेले अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

5- रक्तातील शुगर संतुलित राखते- कारल्याचा रस यामुळे रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होते कारल्या मध्ये असलेले अँटिऑक्सिडंट स्वादुपिंडाच्या कार्याला देखील गती देतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे पचन होण्यास मदत होते  व साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

नक्की वाचा:Health Tips: पायावरचे 'हे' संकेत असू शकतात लिव्हर डॅमेजची लक्षणे, वाचा महत्वपूर्ण माहिती

English Summary: so many health benifit to the drink bitter gourd juice
Published on: 07 October 2022, 05:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)