काकडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात काकडीचे सेवन केले जाते. काकडी मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर थंड ठेवण्यासाठी काकडीचे मदत होते.
तसेच कोथिंबिरी मध्ये देखील काकडी चा वापर केला जातो. कॅलरीजचे प्रमाण काकडीत खूप कमी असल्याने लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील काकडी खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. तुम्हाला माहिती आहे का जेवढी काकडी आरोग्यासाठी फायद्याचे आहे तर त्या प्रमाणात काकडीची साल देखील आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. आपण काकडी खातो परंतु तिचे साल बऱ्याचदा फेकून देतो. परंतु असे न करता हा लेख वाचून काकडीचे सालीचा फायदेशीर उपयोग करणे महत्त्वाचे राहील.
काकडीच्या सालीचे आरोग्यदायी फायदे
1- पचन क्रिया सुधारण्यासाठी- काकडीच्या सालीमध्ये काही तंतू असतात. जेविद्राव्य नसतात. ते फायबर पोटासाठी जीवनदायी औषधी असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही.
2- जीवनसत्त्वांचा स्त्रोत-काकडीच्या सालीमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन आढळतात. जे विटामिन प्रोटीनला ऍक्टिव्ह राहण्यासाठी कार्य करतात. त्यामुळे
पेशींचा विकास होतो यासह ब्लड क्लॉटिंग चे समस्या देखील होत नाही.
3- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर- बरेच लोक जास्त वजनाने त्रस्त आहेत. अशा लोकांनी काकडीच्या सालांचा समावेश आहारामध्ये करणे खूपच फायद्याचे ठरू शकते. काकडी वजन कमी करण्यासाठी वापरले जाते परंतु त्याची साले वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहेत.
4- त्वचेसाठी फायदेशीर - आपल्याला माहित आहेच कि काकडीच्या सालीचा वापर टँनिंग आणि सनबर्नसाठी केला जातो.यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.तसेच त्वचा मोईश्चराईस देखील राहते.तसेच काकडीची साले उन्हात वाळवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्यानंतर त्यात गुलाबजल चे काही थेंब घाला आणि फेस पॅकम्हणून तुम्ही ते लावू शकतात.
5- डोळ्यांसाठी उपयुक्त- काकडी आणि त्यांचे साल खाणे डोळ्यांसाठी खूप चांगले आहे. त्या सालीमध्ये बीटा कॅरोटीन आढळते. त्यामुळे तुमच्या डोळ्याचा प्रकाश वाढतो.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:कौतुकास्पद पार्श्वभूमी! राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार नव्हे शेतकरी राजाचा आत्म सन्मान होय
Published on: 04 May 2022, 09:42 IST