Health

Side Effects Of Watermelon: उन्हाळा आला की बाजारात सर्वत्र टरबूजचं टरबूज (Watermelon) दिसू लागतात. लोकांना उन्हाळ्यात टरबूज खायला खूप आवडते. टरबूज (Watermelon Benifits) हे एक असे फळ आहे जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. टरबूजमध्ये 92% पाणी असते, त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी हे सर्वोत्तम फळ मानले जाते. पाण्याव्यतिरिक्त, टरबूजमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

Updated on 16 June, 2022 10:59 PM IST

100 ग्रॅम टरबूजमध्ये सुमारे 30 कॅलरीज, 0.6 ग्रॅम प्रथिने, 7.6 ग्रॅम कार्ब, 0.2 ग्रॅम फॅट आणि 0.4 ग्रॅम फायबर असतात. पाणी, फायबर आणि कार्ब्समुळे टरबूज खाल्ल्याने पोट सहज भरते आणि भूक कमी लागते. पण इतके फायदे असूनही जर तुम्ही टरबूजचे जास्त प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केले नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

ग्लुकोज पातळी

टरबूजमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यामुळेच टरबूज जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी टरबूज नियंत्रित प्रमाणात खावे असा सल्ला दिला जातो.

मधुमेहामध्ये टरबूज कमी प्रमाणात खा

उष्णतेमुळे लोक अनेकदा थंड वस्तूंकडे ओढले जातात.  टरबूजमध्ये असलेली नैसर्गिक साखर रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. तसेच, त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे, त्यामुळे टरबूज खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नाही.

पाचनसंबंधित विकार असल्यास 

प्रत्येक गोष्टीचा अतिरेक झाल्यास नुकसान अटळ असते. आहाराच्या बाबतीत देखील काही चा तसंच आहे. आहारात फायबरचे जास्त प्रमाण झाल्यास पोटाशी संबंधित अनेक विकार उद्भवू शकतात. या समस्यांमध्ये गॅस, पोट फुगणे आणि जुलाब यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. टरबूज मध्ये देखील फायबर मोठ्या प्रमाणात असते यामुळे याचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास पाचन संबंधित विकार होऊ शकतात.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार होतात 

जास्त टरबूज खाल्ल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते. पोटॅशियमचे जास्त प्रमाण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांना प्रोत्साहन देते. ज्यामुळे टरबुजाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयाचे ठोके अनियमित होतात किंवा हृदयाचे ठोके कमजोर होणे अशा समस्या होऊ शकतात. 

English Summary: Side Effects Of Watermelon: Eating too much watermelon can cause 'these' serious consequences, these people should not eat by mistake, otherwise.
Published on: 16 June 2022, 10:59 IST