आपण नियमित वांग्याची भाजी खात असतो, वांगे खायला खुपच स्वादिष्ट असल्याने याचे सेवन आपण मोठ्या आवडीने करत असतो. वांग्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे की आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पण असे असले तरी काही लोकांनी याचे सेवन करण्यापासून वाचले पाहिजे नाहीतर त्यांच्यासाठी वांग्याचे सेवन महागात पडू शकते आज आपण कोणत्या लोकांनी वांग्याचे सेवन करू नये हे जाणुन घेणार आहोत.
खरं पाहता वांग्याचे सेवन हे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असते, पण वांगी कधीच तळून खाऊ नये असे सांगितले जाते कारण की तळल्याने त्यातील पोषकतत्वे नष्ट होतात. शिवाय याचे सेवन काही विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी याचे सेवन करावे टाळावे. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया याविषयीं सविस्तर.
या व्यक्तींनी टाळावे वांग्याचे सेवन
•पोटाचे विकार असतील तर वांग्याचे सेवन टाळावे - ज्या व्यक्तींना पोटासंबंधित आजार असतील त्यांनी वांग्याचे सेवन करू नये. पोट दुःखी, डोकेदुखी, किंवा उलट्या होत असतील तर अशा वेळी वांग्याचे सेवन टाळावे असा सल्ला आहारतज्ञ देतात. ज्या व्यक्तीला मूळव्याध असेल त्या व्यक्तीने वांग्याचे सेवन कधीच करू नये अन्यथा यामुळे त्रास अजून वाढू शकतो.
•गरोदर स्त्री्यांनी वांग्याचे सेवन टाळावे-गरोदर स्त्रीने वांग्याचे सेवन गरोदरपणात करू नये नाहीतर पोटात असलेल्या बाळाला याचा त्रास होऊ शकतो, तसेच त्याचा पूर्ण विकास होणार नाही.
•ज्या व्यक्तींना स्ट्रेस असेल - ज्या व्यक्तींना डिप्रेशन असेल आणि त्यासाठी त्यांना औषधोपचार चालू असेल तर अशा लोकांनी वांग्याचे सेवन करणे टाळावे. वांग्याचे सेवन केल्याने टॅबलेटचा परिणाम कमी होतो.
•वजन वाढते - ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास असेल तर अशा लोकांनी वांगे खाऊ नयेत, कारण की वांग्यात फॅट अधिक असतो आणि त्यामुळे वजन वाढते. म्हणुन ज्या लोकांना वजन कमी करायचे असेल त्या लोकांनी याचे सेवन करणे टाळावे.
•ऍलर्जी असल्यास - ज्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारच्या अलर्जीचा त्रास असेल अशा लोकांनी वांगी खाऊ नयेत, तसेच ज्या लोकांना डोळ्या संबंधी आजार आहेत त्या लोकांनी याचे सेवन टाळावे.
»टीप: ही माहिती एक सामान्य सूचना आहे, दिलेली माहिती कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला म्हणून घेऊ नका. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Published on: 28 December 2021, 10:59 IST