Health

अनेक लोकांना आवळ्याचे सेवन करणे खूपच आवडते, आवळ्या मध्ये अनेक पोषक तत्वे असल्याने अनेक जण आवळ्याचे सेवन मोठ्या चवीने करतात. तसं पहायला गेलं तर आवळा एक सुपरफुड म्हणून प्रख्यात आहे. आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे देखील होतात. त्यामुळे अनेक डॉक्टर्स देखील आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. असे असले तरी आवळ्या पासून काही साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. आज आपण आवळ्याचे काही साईड इफेक्ट्स जाणून घेणार आहोत तसेच आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांनी आवळ्याचे सेवन करू नये. चला तर मग मित्रांनो जाणून घ्या आवळ्याचे साइड इफेक्ट्स.

Updated on 17 December, 2021 10:37 PM IST

मित्रांनो खरं बघायला गेलं तर आवळा एक सुपर फूड म्हणून ओळखला जातो, हिवाळ्यात याचे सेवन आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते.खूपच कमी व्यक्तींना माहिती असेल की आवळ्यामध्ये संत्र्याच्या 20 पट अधिक विटामिन सी चे प्रमाण असते. विटामिन सी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते विटामिन सी मुळे आपल्या त्वचेला एक वेगळा ग्लो मिळतो. विटामिन सी सोबतच आवळ्यामध्ये असे अनेक अँटिऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात  त्यामुळे आवळ्याचे सेवन हे केलेच पाहिजे. पण असे असले तरी काही लोकांनी आवळ्याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

या लोकांनी आवळ्याचे सेवन करणे टाळावे- ज्या लोकांना असतो ॲसिडिटीचा त्रास- आवळ्या मध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी आढळते जे की आवळ्याला आंबट चव प्रदान करते, त्यामधील अंमल वाढवते. अनेक विशेषज्ञ नुसार व रीसर्च नुसार आवळा हायकोर्टाची डीटी असलेल्या व्यक्तींसाठी घातक सिद्ध होऊ शकतो. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी कधीच रिकामे पोट आवळ्याचे सेवन करू नये, नाहीतर पोटात जलन आणि ऍसिडिटी चे प्रमाण अजूनच वाढेल. 

ज्या लोकांना आहे लो ब्लड प्रेशर त्यांनी टाळावे आवळ्याचे सेवन- आवळा हा आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर कमी करतो. आवळ्याचे सेवन डायबिटीज असलेल्या रुग्णांना फायदेशीर ठरू शकते. परंतु आवळ्याचे सेवन लो ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते, तसेच आवळ्याचे सेवन हे अशा व्यक्तींनी करू नये ज्यांना अँटी डायबिटीज औषधे चालू असतात.

सर्जरी करणारे लोक-ज्या लोकांचे लवकरच कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन अथवा सर्जरी होणार असेल त्या लोकांनी आवळा खाणे टाळावे. आवळ्याचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने ज्या लोकांचे ऑपरेशन होणार आहे त्यांना ब्लीडिंग होऊ शकते, आणि अति रक्तस्रावामुळे हायपोक्सिमिया, ऍसिडोसिस किंवा मल्टीऑर्गन डिसफंक्शन यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. डॉक्टर्स आणि तज्ञांच्या मते, कुठल्याही शस्त्रक्रियेच्या किमान 2 आठवडे आधीपासून आवळा खाणे पूर्णता बंद केले पाहिजे, नाहीतर ब्लीडिंग ची समस्या होऊ शकते, त्यामुळे अशा लोकांनी आवळा खाणे टाळावे.

English Summary: side effects of amla those people who suffering from these deseases avoid amla otherwise big trouble take place
Published on: 17 December 2021, 10:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)