देशात सर्वत्र शीतलहर चालू आहे राज्यात देखील थंडी वाढली आहे. त्यामुळे आहारावर विशेष लक्ष ठेवावे लागते. हिवाळ्यात मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमालीची कमी होते. त्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्न पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात अनेक लोक मोठ्या चवीने वाटाण्याचे सेवन करत असतात. तसं बघायला गेलं तर वाटाणे मध्ये असणारी पोषक घटक मानवी शरीराला अतिशय फायदेशीर ठरतात. यामध्ये असणारे पोषक घटक विशेषता प्रोटीन मानवी शरीराला स्ट्रॉंग बनवण्यास मदत करते. मात्र असे असले तरी वाटाण्याचे सेवन मानवी शरीराला अपायकारक देखील सिद्ध होऊ शकते. वाटाण्याची जास्त सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून आज आपण वाटाण्याचे जास्त सेवन केल्याने मानवी शरीराला होणारे त्रास जाणून घेणार आहोत.
गॅस होऊ शकतो
वाटाण्याचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास अनेक पोटासंबंधित विकार जडू शकतात. वाटाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात गॅस तयार होतो तसेच पोट फुगण्याची समस्यादेखील उद्भवते. त्यामुळे वाटाण्याचे संतुलित प्रमाणात सेवन करणे अनिवार्य असते. यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते
आहार तज्ञांच्या मते वाटाण्यात प्युरिन नावाचे घटक मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे वाटाण्याचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास मानवी शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते. आणि मानवी शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले की त्यामुळे किडनी संबंधित विकार जडू शकतात तसेच यामुळे संधिवाता सारखे आजार देखील उद्भवू शकतात. तसेच ज्या व्यक्तींना आधीच किडनी संबंधित समस्या असतात त्यांनी वाटाण्याचे सेवन करू नये अथवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संतुलित प्रमाणात सेवन करावे.
कॅल्शियम कमी होऊ शकतो
आहार तज्ञांच्या मते वाटाण्या मध्ये फायटीक ॲसिड नामक घटक असतो, हा घटक शरीरातील अनेक पोषक घटक शोषणास अडथळा निर्माण करत असतो. यामुळे कॅल्शियम सारखे पोषक घटक देखील शोषण करण्यास शरीरात बाधा निर्माण होते आणि त्यामुळे पोषक घटकांची शरीरात कमतरता होऊ शकते. कॅल्शियम शरीरात कमी झाल्यास शरीराची हाडे ठिसूळ बनू शकतात. म्हणून वाटाण्याचे संतुलित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे असते.
Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagaran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Published on: 11 January 2022, 11:28 IST