अनेक लोकांना केली खाणे पसंत असते, केळी ही खायला चवीष्ट असल्याने अनेक लोक केळीचे सेवन करतात. डॉक्टर देखील केळीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. केळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. इतर फळांपेक्षा केळीत अधिक विटामिन्स चे प्रमाण आढळते, म्हणून याचे सेवन शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. असे सांगितले जाते कि केळी मध्ये आयरन आणि पोटॅशियम अधिक प्रमाणात आढळते त्यामुळे याचा शरीराला खूप फायदा पोहोचतो. केळीचे सेवन केल्याने आपले हृदय तंदुरुस्त राहते शिवाय थकवा घालवण्यासाठी केळीचे सेवन फायदेशीर ठरते. पण या गुणकारी केळीचा काही साईड इफेक्ट देखील आहे, काही लोकांना केळीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आज कोणत्या लोकांनी केळीचे सेवन करणे टाळावे हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया केळीचे साइड इफेक्ट्स.
केळी खाण्याचे साइड इफेक्ट्स
- मित्रांनो तसे बघायला गेले तर केळीचे सेवन हे आरोग्यासाठी खूपच चांगले असते, पण ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी केळीचे सेवन करणे टाळावे. केळीचे अतिसेवन केल्याने शरीरात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यामुळे ज्या लोकांना आधीपासूनच बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्या लोकांनी केळीचे सेवन कमी प्रमाणात करावे अन्यथा त्यांना अनेक आजाराना सामोरे जावे लागेल.
- ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे किंवा जी लोकं लठ्ठ आहेत त्यांनी केळीचे सेवन करणे टाळावे. केळी मध्ये असलेले फायबर आणि साखर हे वजन वाढवतात त्यामुळे अशा लोकांनी केळीचे सेवन करणे टाळावे व ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी केळीचे सेवन करावे.
- ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी देखील केळीचे सेवन करणे टाळावे. केळीचे सेवन केल्याने पोटात गॅस तयार होतो तसंच पोट दुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच केळीमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असते म्हणुन पाचन होण्यास विलंब होतो.
- ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी देखील केळीचे सेवन करणे टाळावे. केळीचे सेवन केल्याने पोटात गॅस तयार होतो तसंच पोट दुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच केळीमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असते म्हणुन पाचन होण्यास विलंब होतो.
Published on: 20 December 2021, 01:57 IST