Health

मित्रांनो आपण नाही बदामचे सेवन करत असाल बरोबर ना केलेही पाहिजे कारण की बदाम मध्ये असलेले पोषक घटक मानवी शरीराला खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. भारतात जवळपास सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स चे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते बदाम देखील ड्रायफ्रुट्स मधला एक अविभाज्य भाग आहे आणि याचेमोठ्या प्रमाणात सेवन देखील केले जाते. तसेच अनेक आहारतज्ञ बदामचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. बदाम आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच यामुळे नानाविध विकार होण्यापासून वाचले जाऊ शकते. मात्र असे असले तरीबदाम खाल्ल्याने मानवी शरीराला काही नुकसान देखील सहन करावे लागते. काही लोकांना बदाम खाल्ल्याने अनेक मोठ्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आज आपण नेमक्या कोणत्या व्यक्तीने बदामाचे सेवन करू नये याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया कोणत्या लोकांनी बदामाचे सेवन करू नये याविषयी सविस्तर.

Updated on 06 January, 2022 9:49 PM IST

कोणत्या लोकांनी बदामाचे सेवन करू नये

पोटासंबंधित विकार असलेल्या लोकांनी बदामाचे सेवन करणे टाळावे

ज्या लोकांना आधीच पोटा संबंधित विकार असतील त्यांनी बदामाचे सेवन करणे टाळावे. बदाम मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते आणि त्यामुळे बदामाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्टता तसेच पोट फुगणे या सारखे समस्यांना सामोरे जावे लागू शकते म्हणून ज्यांना पोटात संबंधित विकार असतात त्यांनी बदामाचे सेवन करू नये किंवा आपल्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याने संतुलित सेवन करावे.

विटामिन ई वाढवू शकतो

एका व्यक्तीला जवळपास 15 मिलीग्राम विटामिन ई ची आवश्यकता असते. आणि बदाममध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन ई आढळते. त्यामुळे जर बदामाचे जास्तीचे सेवन केले केले तर यामुळे शरीरातील विटामिन ई चे प्रमाण अधिक वाढू शकते जे की आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. म्हणून बदामाचे संतुलित सेवन करणे गरजेचे ठरते. तसेच ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास असेल किंवा पोटासंबंधित विकार असतील तसेच अजूनही कुठली शारीरिक व्याधी असेल तर त्या लोकांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बदामाचे संतुलित सेवन करावे अन्यथा बदामाचे सेवन करू नये.

मुतखडा असलेल्या व्यक्तीने बदामाचे सेवन करणे टाळावे

ज्या लोकांना किडनी स्टोन अथवा मुतखड्याचा त्रास असेल त्या लोकांनी बदामाचे सेवन करणे पूर्णता टाळावे बदाम मध्ये असलेले अक्सलेट नामक घटक अशा लोकांसाठी घातक सिद्ध होऊ शकतात असे असले तरी अशा लोकांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन संतुलित मात्रा मध्ये बदामाचे सेवन केले तर काही हरकत नाही.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: side effect of almonds these persons should avoid eating almonds otherwise
Published on: 06 January 2022, 09:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)