पण गोड पूर्णपणे खायचे टाळण्याऐवजी त्यावर थोडे नियंत्रण मिळवा. मग साखरेऐवजी जीभेचा गोडवा वाढवणारा एक असाच पदार्थ म्हणजे ' मध'. पण हे मध शुद्ध असणे फार गरजेचे आहे.मधुमेहींनी नेमके किती मध खावे ? साखरेऐवजी मध खाणे हा एक आरोग्यदायी उपाय आहे.
हे अनेक अभ्यासांमधून पुढे आलेले सत्य आहे. मधाचा ग्ल्यासमिक निर्देशांक ( रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्याची क्षमता ) कमी असतो. तसेच साखरेच्या तुलनेत मध 'इन्सुलिन' फारच कमी प्रमाणात वापरते.1 टेबलस्पून मध = 17 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मधुमेहींच्या आहारातील विशेष काळजीची गोष्ट म्हणजे त्यांच्या आहारात असलेल्या कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण.
मधात साखरेपेक्षा कॅलरीज अधिक असतात तसेच चवीलाही अत्यंत गोड असते. त्यामुळे साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास कमीत कमी प्रमाणात अधिकाधिक गोडवा मिळण्यास मदत होते.खास टीप - मधाचा आहारात वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा व आहारतज्ञांचा जरूर सल्ला घ्यावा.
तसेच तुम्ही वापरत असलेले मध हे शुद्ध असल्याची खात्री करून घ्या. त्यातील भेसळ टाळण्यासाठी या काही घरगुती चाचण्या अवश्य कराव्यात. तसेच मध हे प्रमाणातच खावे. कारण मधाच्या सेवनाचेही दुष्परिणाम होतात.
Nutritionist & Dietician
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Published on: 06 May 2022, 12:49 IST