Health

कुठल्याही प्रकारचे आहाराला मिठाशिवाय त्याला चव येतच नाही हे आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी बर्याच जणांना आहारामध्ये मिठाचे प्रमाण थोडे जास्त असलेले आवडते तर काहींना मीठ कमी असलेले आवडते.

Updated on 29 May, 2022 9:49 PM IST

कुठल्याही प्रकारचे आहाराला  मिठाशिवाय त्याला चव येतच नाही हे आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी बर्‍याच जणांना आहारामध्ये मिठाचे प्रमाण थोडे जास्त असलेले आवडते तर काहींना मीठ कमी असलेले आवडते.

परंतु एक निसर्गाच्या नियमानुसार कुठल्याही गोष्टीचा एक समतोल असणे खूप गरजेचे असते. ज्याप्रकारे एखाद्या गोष्टीचा अतिरेक शरीरावर वाईट परिणाम करू शकतो तर  काही गोष्टींचे कमी प्रमाण देखील धोकादायक ठरते. हीच गोष्ट मीठा ला देखील लागू होते.

जर तुम्ही जास्त प्रमाणात मीठाचा आहारात वापर केला तर ते सुद्धा तुम्हाला काही आजारांसाठी कारण ठरू शकते तसेच  मिठाचे कमी प्रमाण देखील धोकादायक आहे. या लेखामध्ये आपण कमी मीठ खाल्ल्याने काय परिणाम होतात ते जाणून घ्या.

 मीठ कमी खाण्याचे तोटे

1- मधुमेह- कमी मीठ खाल्ल्यामुळे आपण सोडियमचे प्रमाण पुरेसे घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण टाईप 2 मधुमेहाला बळी पडू शकतो. मिठाची कमतरता थेट इन्सुलिनच्या संवेदनशीलतेशी निगडित आहे. इन्शुलिन संवेदनशीलता कमी करून कार्यक्षमता वाढते.

मधुमेहाची सुरुवातीची अवस्था म्हणजे इन्सुलिन संवेदनशीलतेचा अभाव हे होय. टाइप 1 आणि टाईप 2  मधुमेह असलेल्या लोकांमध्ये कमी सोडियमयुक्त आहारामुळे मृत्यूचा धोका वाढू शकतो.

2- कोलेस्टेरॉल - ट्रायग्लिसराईडची समस्या - जे लोक कमी प्रमाणात मीठ खातात त्यांच्यामध्ये रेनिन, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड चे प्रमाण अधिक होते. निरोगी लोकांमध्ये कमी सोडियम युक्त आहार एल डी एल अर्थात खराब कोलेस्टेरॉल 4.6  आणि ट्रायग्लिसराईड 5.9टक्के वाढवतो.

3- लो ब्लड प्रेशर- जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला उच्च रक्‍तदाबाचा त्रास देखील होऊ शकतो. अशी भीती जर तुम्हाला असेल तर तुम्ही मीठ कमी खाल्ले तर विनाकारण कमी मीठ खाल्ल्याने देखील तुम्हाला लो ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो.

4- मेंदूला सूज, फेफरे येण्याचा धोका- हायपोना ट्रेमिया ही अशी स्थिती आहे. ती रक्तातील सोडियम च्या कमी प्रमाणामुळे उद्भवते. कमी मीठ खाल्ल्याने या स्थितीचा धोका वाढतो. त्याची लक्षणे डिहायड्रेशन मुळे दिसणार्‍या लक्षणं सारखेच असते. मध्ये समस्या गंभीर झाला असेल तर एखाद्या व्यक्तीलामेंदूला सूज देखील येऊ शकते त्यामुळे डोकेदुखी, फेफरे आणि मृत्यूदेखील होऊ शकतो.

 दिवसभरात किती मिठाचे प्रमाण ठेवावे?

 शरीरामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त झाले तर उच्चरक्तदाब होतो तर त्याचे कमी सेवन केल्याने अनेक आजार देखील होतात. त्यामुळे त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे याचा सल्ला दिला जातो.

निरोगी राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीने दररोज किती प्रमाणात मीठ खावे याबद्दल नॅशनल ऍकॅडमी ऑफ मेडिसिनने दररोज दोन हजार 300 मिली पेक्षा कमी मीठ खाण्याची शिफारस केली आहे.

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे.या माहितीशी व्यक्तिगत रित्या आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही.

कुठल्याही उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Business Idea 2022: कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय सुरु करा आणि लवकरच लखपती बना, वाचा सविस्तर

नक्की वाचा:Health Tips: चुकून दूषित पाणी पिल्यास आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम; वाचून बसेल धक्का

नक्की वाचा:Petrol & Diesel Shortage: 31 मे ला पेट्रोल-डिझेलचा असणार शॉर्टेज; आजच फुल करा गाडीची टाकी

English Summary: short quantity fo salt in diet is dengerous to health so take proper quantity
Published on: 29 May 2022, 09:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)