विटामिन डी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या महत्त्वपूर्ण विटामिन डी चा नैसर्गिक आणि मुबलक स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश हा होय.
त्यानंतर मासे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन-डी मुबलक प्रमाणात आढळते. परंतु आता टोमॅटो मध्ये सुद्धा विटामिन डी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असून दोन अंड्यामध्ये असणारे विटामिन D चे प्रमाण हे अवघ्या एका टोमॅटोत असणार आहे.
त्यामुळे जगातील शंभर कोटी लोक विटामिन डी च्या कमतरतेने त्रस्त आहेत. त्यामुळे आता या सगळ्या लोकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. खरतर हे गिफ्ट इंग्लंडमधील जॉन इनेस सेंटरच्या शास्त्रज्ञांनी शाकाहार घेणाऱ्या लोकांसाठी हा विशेष शोध लावला आहे. जर आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये जवळजवळ 70 टक्क्यांपेक्षा अधिक लोक विटामिन डीच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.
सुपर टोमॅटोच्या बाबतीत संशोधन
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शास्त्रज्ञांनी CRISPR या तंत्रज्ञानाचा वापर करून विटामिन डी असलेले टोमॅटो बनवला आहे.
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधक कोणत्याही गोष्टीच्या जेनेटिक कोड मध्ये बदल करण्यात सक्षम असतात.CRISPR टुल च्या मदतीने शास्त्रज्ञांनी टोमॅटोच्या जीनोम रचनेमध्ये बदल केल्यामुळे टोमॅटो आणि त्याच्या पानांमध्ये 7-DHCघटक जमा होऊ लागले व हा घटक उत्तम प्रकारे विटामिन डी ची पातळी वाढवतो. या एका टोमॅटोमध्ये दोन अंड्याइतके विटामिन डी आणि 28 ग्राम टुना माशांच्या बरोबरीने विटामिन डी आढळले.
हे सगळे संशोधन जर्नल नेचर प्लांट्स मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रज्ञांचे टोमॅटो आणि त्याची पाने एका तासासाठी अल्ट्रा व्हायलेट प्रकाशात आणली. परंतु संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या जीनोम बदललेल्या टोमॅटो वर अल्ट्रा व्हायलेट प्रकाश ऐवजी नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा परिणामाचा देखील अभ्यास करण्यात येणार असून त्यासाठी हे टोमॅटो आता बाहेर सूर्यप्रकाशात पिकवले जाणार आहे.
यावरून त्यांच्यामध्ये असलेले 7 DHC विटामिन डी थ्री मध्ये रुपांतरीत होत आहे की नाही हे समजेल.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:गाडीमध्ये पेट्रोल भरून ठेवा नाहीतर या दिवशी होईल तुमची गैरसोय! जाणून घ्या सविस्तर माहिती
नक्की वाचा:अतिरिक्त उसावर आता प्रशासनही हतबल, आता ऊस फडातच राहणार? पहा आकडेवारी
नक्की वाचा:वाढलेले दुधाचे दर केंद्राला बघवेनात, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे दूध दरात कपात
Published on: 28 May 2022, 04:22 IST