Health

जास्त वजनाच्या समस्येने बरेच जण त्रस्त आहेत.महतप्रयास करून देखील बर्या च जणांचे वजन कमी होत नाही.वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयोग केले जातात. परंतु बऱ्याचदा वजन कमी होतचनाही.परंतुया लेखात आम्ही तुम्हाला असा एक आगळावेगळा फंडा सांगणार आहोत.

Updated on 07 November, 2021 9:05 PM IST

जास्त वजनाच्या समस्येने बरेच जण त्रस्त आहेत.महतप्रयास करून देखील बर्‍याच जणांचे वजन कमी होत नाही.वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयोग केले जातात. परंतु बऱ्याचदा वजन कमी होतचनाही.परंतुया लेखात आम्ही तुम्हाला  असा एक आगळावेगळा फंडा सांगणार आहोत.

.तो तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यास मदत करेल. अलीकडे अनेक चहा चे वेगवेगळे प्रकारपाहायला मिळतात. यातील काही चहा फुला पासून बनवले जातात.या चहा पैकीच एक गुलाब फुला पासून बनवलेला चहाखूपच लोकप्रिय होत आहे. या लेखात आपण गुलाब चहा बद्दल माहितीघेणार आहोत.

गुलाब चहाचे आरोग्यदायी फायदे

 गुलाब चहा वजन कमी करण्यास मदत करते.

त्यासोबतच या चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. गुलाब चहा चे जर तुम्ही नियमितपणे सेवन केले तर तुमच्या त्वचेमध्ये सुधारणा होते व केस निरोगी राहतात. याच्यामध्ये अँटीऑक्सीक्सीडेंट असतात. त्यामुळे तिच्या पचनासाठी देखील चांगली असते.

  • वजन कमी करण्यासाठी उपयुक्त-गुलाब चहामध्ये अँटिऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात.जे वजन कमी करण्यास मदत करतात.
  • पचनसंस्थेसाठी उत्तम- गुलाब चहा हर्बल टी म्हणून ओळखली जाते.त्यामुळेच पाचन तंत्र सुधारण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी एक निरोगी पाचन तंत्र म्हणून एक किंवा दोन कप गुलाब चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • विष काढून टाकण्यास मदत(अँटी टॉक्सिक)- या चहा च्या मदतीनेशरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. जे आपल्या शरीरासाठी निरोगी वजन राखणे सोपे करते. हे एक निरोगी कॅफिन मुक्त पर्यायी पेय आहे.जे आपल्या आरोग्याला फायदेशीर आहे.हा चहा प्यायल्याने तुम्हाला तुमचे पोट भरल्यासारखे वाटते.

 

गुलाब चहा कसा बनवावा?

  गुलाब चहा बनवण्यासाठी एक किंवा दोन गुलाब घ्यावेत. दोन कप पाणी गरम करा. या गरम केलेल्या पाण्यामध्ये गुलाबाचे फुले टाका. हे पाणी दहा मिनिटे चांगले उकळू द्या.त्यानंतर हे पाणी फिल्टर करा आणि एका कपमध्ये काढून द्या.यामध्येथोडे मध आणि लिंबाचा रस घालून त्याचे सेवन करा.दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन करता येते. हा चहा वजन कमी करण्यास उपयुक्त ठरेल आणि आपली त्वचा देखील चमकदार करेल. (स्त्रोत-tv9 मराठी)

English Summary: rose tea benificial for weight loss to know how to make rose tea
Published on: 07 November 2021, 09:05 IST