Health

सध्या माणसाचे जीवन इतके व्यस्त झाले आहे की स्वस्तासाठी सुद्धा थोडा वेळ मिळत नाही. त्यामुळे आरोग्यावर विविध समस्या निर्माण होत असतात. दिवसभराच्या दगदगीमुळे आरामात बसणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे शरीराच्या आणि मानसिक विश्रांतीबाबत अनेक समस्या उद्भवत असतात.

Updated on 27 September, 2022 1:29 PM IST

सध्या माणसाचे जीवन (life) इतके व्यस्त झाले आहे की स्वस्तासाठी सुद्धा थोडा वेळ मिळत नाही. त्यामुळे आरोग्यावर (health) विविध समस्या निर्माण होत असतात. दिवसभराच्या दगदगीमुळे आरामात बसणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे शरीराच्या आणि मानसिक विश्रांतीबाबत अनेक समस्या उद्भवत असतात.

दिवसभराच्या कामानंतर येणारा थकवा असो किंवा अशक्तपणा. या समस्यांपासून प्रत्येकाला सुटका हवी असतेच. तर यावर घरगुती उपाय काय? आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

1) पाण्याचे प्रमाण जास्त ठेवा

अनेकदा लोक जास्त पाणी पिण्यास टाळतात कारण जास्त पाणी प्यायल्याने वारंवार वॉशरूमला जावे लागते. हे टाळण्यासाठी लोक कमीत कमी पाणी पितात. असे करणे शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. जास्त पाणी पिणे हे तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

2) चांगले निरोगी अन्न

आपल्या शिराराला निरोगी ठेवण्यासाठी निरोगी अन्नाची गरज असते. परंतु आपण पौष्टिक अन्न खाण्याऐवजी बाजारात मिळणार्‍या विरुद्ध खाद्यपदार्थाचे सेवन करतो. त्यामुळे आपल्या शरीरात थकवा आणि कमजोरी वाढते. निरोगी अन्न, हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनेयुक्त अन्न खाल्ले तर नक्कीच तुम्हाला चांगला आराम मिळेल.

सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसभर अॅक्टिव्ह (Active) राहायचे असेल तर नियमित व्यायाम करा. दररोज एक तास व्यायाम केला तर दिवसभरात थकवा दूर होईल आणि तुमचे शरीर निरोगी राहील.

रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; मोफत रेशनबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

अशक्तपणा असा दूर करा

दररोज व्यायाम करा. रोज ध्यान करून प्रारंभ करा. आपल्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे. कठोर वर्कआउट्स टाळण्याचा प्रयत्न करा. दररोज सकाळी 30 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. एक खारीक, बेदाणे, दोन बदाम, रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले दोन अक्रोड, सकाळी खा. हलकं आणि सुपाच्य अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

या गोष्टींची काळजी घ्या

शक्यतो जास्त साखर, तळलेले पदार्थ खाणे टाळा. महत्वाचे म्हणजे पौष्टिक खिचडी (Nutritious Khichdi) एक दिवसाआड खा. आठवड्यातून 2-3 वेळा भाज्यांचे सूप प्या. जिरे-बडी शोपचा चहा दिवसातून दोन वेळा म्हणजे जेवणानंतर एका तासाने प्या. रात्री लवकर झोपा. सकाळी लवकर उठा. पुरेशी झोप घ्या.

महत्वाच्या बातम्या 
आता तुमची पेन्शन तुम्हाला ठरवता येणार; एलआयसीची सरल पेन्शन योजना देतेय मोठी संधी
पशूपालकांसाठी महत्वाची बातमी! जनावरांच्या आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण तपासा, अन्यथा...
शेतकऱ्यांनो कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर प्लायमाउथ रॉक कोंबडीचे पालन कराच...

English Summary: Remove body fatigue weakness home remedies
Published on: 27 September 2022, 01:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)