तर त्याचं उत्तर म्हणजे ते निसर्गाचा वापर आपल्या जीवनासाठी करत होते. आज आपण जाणून घेणार आहोत महत्वाच्या टीप्स वजन कमी करण्यासाठी :- ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :- रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा (यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल) चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे.
सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात.मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :- पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :- लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.
केसगळती :- घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर,तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे),१ चमचा ब्राह्मी पावडर,१ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे.त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
चेहरा धुण्यासाठी :- ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे.तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा.नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे.अर्धा चमचा जिरे व ओवा (यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल) चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा.म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.
Published on: 29 May 2022, 01:45 IST