Health

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतात. चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार गरजेचा असतो. ब्लड प्रेशर, तणाव अशा छोट-मोठ्या उद्भवणाऱ्या आजरांवर उपाय काय? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Updated on 08 October, 2022 2:01 PM IST

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतात. चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार गरजेचा असतो. ब्लड प्रेशर (Blood pressure), तणाव अशा छोट-मोठ्या उद्भवणाऱ्या आजरांवर उपाय काय? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम 1999 साली जागतिक हास्य दिवस साजरा करण्यात आला होता. यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच काल हा हास्य दिवस साजरा झाला. हसण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे (benefits for health) आहेत. तुम्ही जर रोज हसलात तर तुम्ही अनेक आजारांना क्षणात दूर करू शकता. हसण्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही (mental health) सुधारते.

ताण होतो क्षणात दूर

हसल्यामुळे आपल्या शरीराचा थकवा दूर होतो आणि तणाव कमी होतो. खास गोष्ट म्हणजे आपल्याकडे हसण्याचं काहीही कारण नसलं आणि तरीही आपण हसलो, तर तणावाची पातळी कमी होते. त्यामुळे तुम्ही अधिक तणावात असाल तर हसण्याचा प्रयत्न करा.

सावधान! राज्यात पावसाचा वेग वाढला; हवामान विभागाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात 'यलो' अलर्ट जारी

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

जगभरातील कोट्यावधी लोकं हाय ब्लड प्रेशरचा त्रास सहन करत आहे. ब्लड प्रेशर वाढले तर हार्ट ॲटॅकसह (Heart attack) अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. तुम्ही जर दररोज हसलात तर तुमचे ब्लड प्रेशर कमी होईल. ही बाब अनेक अभ्यासातून समोर आली आहे. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज हसले पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते ते लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ती मजबूत करण्यासाठी लोकं औषधांची मदत घेतात. मात्र ते हसत राहिले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या सविस्तर

वेदनांपासून सुटका मिळते

जर तुमच्या शरीरात वेदना होत असतील तर तुम्ही हसून त्या कमी करू शकता. हसण्यामुळे आपल्या शरीरातून एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स रिलीज होतात, जे नैसर्गिक पेन किलर म्हणून कार्य करतात. यामुळे शरीराला रिलॅक्स वाटतं आणि मूडही सुधारतो.

महत्वाच्या बातम्या 
'लम्पी स्कीन'ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल; मिळणार इतकी रक्कम
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात होणार मोठी वाढ; जाणून घ्या आजचे भाव
जनावरांचे दूध वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केला सर्वोत्तम आहार; 100 टक्के दूध उत्पादनात होणार वाढ

English Summary: Relief blood pressure stress pain just 2 minutes one thing
Published on: 08 October 2022, 02:01 IST