Health

वजन कमी करायचं तर भरपूर प्रोटीन खा असं ऐकून तुम्हीही खूप प्रोटीन खाताय,

Updated on 20 October, 2022 8:29 PM IST

वजन कमी करायचं तर भरपूर प्रोटीन खा असं ऐकून तुम्हीही खूप प्रोटीन खाताय, उसळी- नॉनव्हेज-पनीर-सोयाबिन पण एवढं प्रोटीन खाणं खरंच फायद्याचं आहे की त्याचे दुष्परिणामच जास्त होत आहेत.वजनावर नियंत्रण मिळवणं हा फार पूर्वीपासून माणसाला असणारा जणू ध्यास आहे आणि असं असलं तरी स्थूलतेचं जगभर वाढणारं प्रमाण ही देखील सत्य परिस्थिती आहे. गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये वजन,स्थूलता, व्यायाम यांचं प्रस्थ

खूपच वाढलं आणि मग देश विदेशात डाएटची असंख्य फॅड जन्माला आलीत आणि गेलीत!Much increased and then numerous diet fads were born and gone in the country and abroad!

शिवार फेरीचा दुसरा दिवस फुललेले शिवार अन् ओसंडणारा उत्साह

एक एक डाएट चर्चेत आलं की त्याची जणू जगभर लाट येते ! मग तेच डाएट कसं उत्तम आहे याचे दाखले- पुरावे दिले जातात. मग काही महिन्यांनी दुसरं काहीतरी येतं आणि पहिलं मागे पडतं असं वर्षानुर्वष घडत आलं आहे. मग त्यातूनच कार्बोहायड्रेट , प्रोटिन्स,फॅट्स असे शब्द वारंवार कानावर येऊ

लागले. जिममध्ये जायचं, भरपूर व्यायाम करायचा, घाम गाळायचा आणि मग स्नायूंची ताकद आणि त्याचप्रमाणे आकार वाढलेला दिसावा म्हणून काहीतरी प्रोटीन पावडर किंवा इतर काही सप्लिमेण्ट यांचा आहारात समावेश करायचा असा एक ट्रेण्ड सुरु झाला.काही आहारतज्ज्ञांचा या ट्रेण्डला विरोध आहे. त्यांच्यामते, कशाला हव्यात या महागड्या प्रोटीन पावडरी आणि सप्लिमेण्टस. आपली

कडधान्यं काय कमी गुणकारी आहेत का !’ मग भरपूर प्रमाणात भिजवलेली कच्ची अथवा उकडलेली कडधान्यं खाल्ली जाऊ लागली! यात मग अगदी हिरव्या मुगापासून तर छोले, हरभरे, राजमा, वाटाणे या सगळ्यांचा समावेश झाला. पनीर, सोया मिल्क, सोया चंक्स हे ही त्यातून सुटले नाहीत. गहू दळून आणताना त्यात सोयाबीन दळले जाऊ लागले. हे इतकं वाढलं की लहान मुलांना देखील उत्तम

वाढीसाठी प्रथिनं खूप गरजेची आहेत आणि ती भरपूर मात्रेत दिली गेली पाहिजेत हे आयांच्या मनावर अगदी परिणामकारकपणो बिंबवलं गेलं आणि मुलांना भरपूर उसळी खाऊ घातल्या पाहिजेत या भावनेनं अनेक आया रोज रात्री कडधान्यं आठवणीनं भिजवू लागल्या!मात्र सर्रास प्रथिनंयुक्त आहार भरपूर प्रमाणात घेणं हे आरोग्यविषयक इतर समस्या निर्माण करू शकतं हे हळूहळू समोर येत आहे. त्यामुळे प्रथिनांचा आहारात समावेश करताना काही नियम पाळण्याची गरजही वाटू लागली आहे.

 

Nutritionist & Dietitian

Naturopathist

Dr. Amit Bhorkar

whats app: 7218332218

English Summary: Read how much protein should be eaten daily?
Published on: 20 October 2022, 05:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)