Health

शेवग्याच्या पानांपासून पावडर शेवग्याच्या शेंगाचे (Drumstick) आरोग्यदायी खूप फायदे आहेत.

Updated on 05 July, 2022 7:22 PM IST

शेवग्याच्या पानांपासून पावडर शेवग्याच्या शेंगाचे (Drumstick) आरोग्यदायी खूप फायदे आहेत. शेवग्याची कोवळी पाने फुले आणि शेंगाची भाजी (Drumstick Recipe) करत असतात. आयुर्वेदात शेवगाचे यांचे फायदे सांगितलेले आहेत. आणि यामध्ये प्रथिने पोषक अन्नघटक लोह, बी १२. कॅरोटीन, अमिनो अॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, क आणि ब यांसारखी जीवनसत्त्व असतात. ही जीवनसत्त्वे शरीराची रोग्यप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करत असतात आणि शेवगा बहुगुणकारी आहे. यामध्ये जास्त प्रमाणात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण आढळत आहे आणि जीवनसत्त्व अ हे डोळांसाठी आवश्यक आहे.

आरोग्यदायी गुणधर्म : १) शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर फायदेशीर ठरत आहे आणि यामध्ये पालक भाजीपेक्षा दुपटीने लोहाचे प्रमाण आहे.२) शेवग्याच्या पाने शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढविण्यासाठी मदत करत असतात आणि अल्सर, ट्यूमर, नियंत्रण, सांधे दुखी सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.३) शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगाही अत्यंत फायदेशीर ठरत असतात आणि यामध्ये रक्त शुद्धीकरणाची क्षमता असते,.४) रक्तातील दूषित घटक वाढल्याने होणारा आम्लाचा त्रास त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यास शेंगा फायदेशीर ठरत असतात.

५) शेवग्याच्या शेंगामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते परिणामी मधुमेहनियंत्रणात राहण्यास मदत होत असते आणि पित्ताशयाचे कार्यही सुरळीत होते.६) घशातील खवखव, कफ, सर्दी, श्वास घेताना त्रास होत असल्यास शेंगाचे सूप प्यावे. यामधील पोषणतत्त्वे श्वसन मार्गातून धोकादायक घटक कमी करण्यास मदत करत असतात आणि टीबी, ब्रोकायटिस, अस्थमा यांसारख्या आजारांवर शेंगा उपयुक्त आहेत.७) डोळ्याची दृष्टी वाढविण्यासाठी कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यास मदत होत असते.८) शक्यतो उकळत्या भाजीमध्ये शेवगा पावडरचा वापर करू नका.

भाजी उकळून गॅस बंद केल्यानंतर मिसळावी म्हणजे पावडर मधील जीवनसत्त्व 'अ'चे प्रमाण स्थिर राहत असते.शेंगा पाने आणि बियांपासून मूल्यवर्धित पदार्थशेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जात असतो. पाने भाजी स्वरूपात खाण्यासाठी उपयोगी येत असतात आणि पाने वाळवून त्याची भुकटी बनवून त्याचा वापर भाज्या, पास्ता ब्रेड रोल इतर खाद्य पदार्थामध्ये केला जात असतो.पानांचा रस : - शेवग्याची १० किलो ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत आणि ती मंद आचेवर ५ मिनिटे गरम करावीत व त्यानंतर थंड करून घ्यावीत.- शेवग्याच्या १० किलो पानांमध्ये १ लिटर पाणी मिसळून हॅमरमिलच्या साह्याने बारीक करून (दळून) घेत असतात.

English Summary: Read and make powders, teas, juices from sugarcane leaves
Published on: 05 July 2022, 07:22 IST