Health

योगासन व प्राणायमामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आजार देखील बरे होऊ शकतात

Updated on 30 July, 2022 2:29 PM IST

योगासन व प्राणायमामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आजार देखील बरे होऊ शकतात योग करण्यासाठी शरीराला खूप ताण देण्याची गरज पडत नाही,यासाठी बाहेर कुठेही जाण्याची ही गरज पडत नाही.आपण आपल्या घरीच योगासन व प्राणायाम करू शकतो, तसेच योगासनाच्या माध्यमातून लठ्ठपणा, मधुमेह, हाय बीपी, अशा दीर्घ आजारावर ही मात करू शकतो.

योगासनांचे फायदे(Benefits of Yogasanas): – योग केल्याने शरीर आणि मन ताजेतवाने राहते तसेच शरीराचा व मनाचा थकवा संपतो योगासन हे अध्यात्मिक दृष्ट्या देखील आपल्याला फायदा देतात.योगासना मुळे शरीराच्या अंतर्गत प्रक्रिया सुरळीत राहतात.योगासनांमुळे पोट व्यवस्थित साफ होते तसेच पचनशक्ती सुधारते.योगासन हे आपल्या मणक्याची लवचिकता वाढवून पूर्ण शरीर देखील लवचिक बनवते.

योगासनांमुळे आपल्या मांसपेशींना ताकत मिळते, तसेच लठ्ठपणा कमी होऊन अशक्त व बारीक व्यक्ती देखील तंदुरुस्त बनतो.योगासन केल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये रक्त प्रवाह वाढतो व चेहऱ्यावरती तेज येऊन त्वचा चमकदार बनते.योगासनामुळे शरीरामध्ये भरपूर ऑक्सीजन घेतला जातो ज्यामुळे आपले फुफुस निरोगी राहतात. व शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळते.

थोडक्यात सांगायला गेलं तर योगासन हे आपल्यासाठी वरदानच आहे त्याचा शरीराच्या सर्व भागावर परिणाम होतो व सर्व क्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.ज्याप्रकारे कुठल्याही गोष्टीचे फायदे असतात तसेच त्या गोष्टीचे नुकसान ही असतात म्हणून जर आपण चुकीच्या पद्धतीने योगासन केली तर मात्र आपल्याला योगासनांमुळे नुकसान होऊ शकते.योग करा परंतु सावधगिरी बाळगा

जेवण केल्यानंतर योगा अभ्यास करू नये. कारण पोटामध्ये अन्न शिल्लक असल्यामुळे आपण योग अभ्यास करू शकत नाही परंतु जर आपण त्रास होत असताना देखील योगासन करत असाल तर मात्र ते आपल्याला नुकसान देऊ शकते. त्यामुळे जेवण आणि योग अभ्यासामध्ये किमान दोन तासांचे अंतर असले पाहिजे.

योगाभ्यास करताना आरामदायी व सेल कपडे अंगावरती असावे.मासिक पाळी मध्ये स्त्रियांनी योगाभ्यास करू नये. विशेष करून सूर्यनमस्कार व शरीरावर जास्त ताण येणारे योगासने तर करूच नये.योगासन करण्यापूर्वी देखील सूक्ष्म व्यायाम करणे गरजेचे असते. यामुळे आपल्या शरीराला झटका किंवा इतर कुठलीही समस्या होत नाही. त्यामुळे योगासन सुरू करण्याअगोदर सूक्ष्म व्यायाम करावे

तसेच योगासनं अभ्यास झाल्यानंतर दहा मिनिटं शवासणाचा अभ्यास करावा.योगाभ्यास व प्राणायमाचा चांगला ताळमेळ लागल्यानंतर आपण मेडिटेशन म्हणजे ध्यान या कडे वाटचाल करावी. मेडिटेशन हे आपल्या मेंदू वर तील तणाव कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. मेडिटेशन मुळे हृदयाची गती नियंत्रित ठेवता येते. त्याचबरोबर दिवसभर उत्साही राहण्यासाठी व सकारात्मक विचारासाठी रोज सकाळी योग अभ्यास झाल्यानंतर आपण मेडिटेशन करू शकता.

English Summary: Read and get started on yoga, mental change and fitness
Published on: 30 July 2022, 02:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)