मधुमेह हा आजार आपणास चुकीच्या आहारामुळे तसेच खराब जीवनशैलीमुळे होतो. आपल्या शरीरातील जी ब्लड शुगर आहे ती ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्याचे काम आपल्या शरीरात असणारे इन्सुलिन करत नाही त्यामुळे हा आजार आपणास जडतो. मागील अनेक वर्षांपूर्वी मधुमेह हा आजार वृद्ध व्यक्तींना होत होता मात्र काळाच्या ओघात हा आजार लहान वयात असतानाच जडत आहे. मधुमेह आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवढे औषधे प्रभावी असते तेवढयाच प्रमाणत घरगुती उपाय ही नियंत्रण ठेवतात. कच्ची हळद ही मधुमेह आजारावर नियंत्रण ठेवते.
कच्चा हळदीमध्ये आहेत एवढे सर्व गुणधर्म :-
अनेक शतकांपासून रोगांवर उपचार म्हणून हळदीचा वापर केला जातो. जसे की आपणास कुठे जखम झाली असेल तर त्या जखमेवर हळदीचा लेप लावावा त्याने आपणास जखमेच्या ज्या वेदना होतात त्या वेदना कमी होतात. कच्चा हळदीमध्ये व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, फॉस्फरस, थायामिन, रिबोफ्लेविन एवढ्या प्रमाणत घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
मधुमेहामध्ये कच्च्या हळदीचे फायदे :
१. कच्चा हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा एक घटक असतो जो आपल्या शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह सारखा आजार आहे त्या लोकांनी आपल्या आहारात कच्चा हळदीचा वापर करावा.
२. आपल्या शरीरात जे इन्सुलिन चे प्रमाण असते ते प्रमाण योग्य ठेवण्याचे काम कच्ची हळद करत असते त्यामुळे कच्ची हळद आहारात असावी.
कच्ची हळद मधुमेह कशी नियंत्रित करते, जाणून घ्या संशोधन :
हळदीमध्ये असणारा कर्क्युमिन हा घटक आपल्या शरीरातील सर्व समस्यांवर फायदेशीर ठरत असतो. २०१३ मध्ये संशोधकांनी जे संशोधन केले त्यानुसार आपल्या शरीरातील ब्लड शुगर कमी करण्याचे काम कच्चा हळदीत असणारा कर्क्युमिन हा घटक करू शकतो. याव्यतिरिक्त मधुमेहसंबंधी जी गुंतागुंती आहे ती सुद्धा कमी करण्याचे काम हा घटक करू शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की मधुमेह आजार संबंधी कर्क्युमिन या घटकाची महत्वाची भूमिका आहे. याबद्धल आणून माहिती करण्यासाठी अजून संशोधनाची आपणास गरज आहे.
Published on: 05 February 2022, 06:17 IST