Health

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खानपाणामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य पुरते कोलमडले आहे. आज आपण मानवी आरोग्य विषयी विशेषता पुरुषांच्या आरोग्य विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण वैवाहिक पुरुषांना स्वस्थ राहण्यासाठी मनुक्याचे सेवन किती फायदा पोहोचवू शकते याविषयी जाणून घेणार आहोत. खरं पाहता मनुके खाण्याने सर्वांनाच फायदा मिळत असतो, मात्र असे असले तरी याचा विवाहित पुरुषांना अधिक फायदा मिळू शकतो याच्या सेवनाने विवाहित पुरुषांना दुहेरी फायदा होत असल्याचे सांगितले जाते.

Updated on 02 March, 2022 1:02 PM IST

मनुक्यामुळे मानवी शरीराला अनेक फायदे मिळत असतात पण आपण मनुक्याचे सेवन कशा पद्धतीने करतात यावर याचा रिजल्ट अवलंबून असतो. तसं बघायला गेलं तर मनुके अनेक प्रकारे खाल्ले जातात. बहुतेक लोक फक्त मनुक्याचे सेवन करत असतात, तर बरेच लोक मनुके भिजवून खातात. यासोबतच असेही लोक आहेत जे की, दुधात मनुके भिजवून खातात, पण तुम्हाला माहित आहे का मधात मनुके खाल्ल्याने विवाहित पुरुषाला किती मोठे फायदे मिळतात. असे मानले जाते की, मधात मनुके खाल्ल्याने पुरुषाची लैंगिक शक्ती वाढते. चला तर मग जाणून घेऊया या व्यतिरिक्त मधात मनुके खाल्ल्याने काय फायदे आहेत आणि मधात मनुके टाकून कधी आणि कसे सेवन करावे.

मनुका खाण्याचे विवाहित पुरुषांना होणारे फायदे 

  • असे सांगितलं जातं की, मध आणि मनुका खाणे पुरुषांसाठी अधिक फायद्याचे आहे, कारण की, हे दोन्ही पदार्थ टेस्टोस्टेरॉन वाढवणाऱ्या पदार्थांच्या गटात मुडत असतात.  असे म्हटले जाते की, यामध्ये असा एक हार्मोन असतो जो पुरुषांना त्यांच्या लैंगिक समस्यांवर मात करण्यास आणि त्यांच्या विविध शारीरिक समस्यांवर मात करण्यास मदत करतो. यामुळेच मध आणि मनुका याचे एकत्रित सेवन विवाहित पुरुषांसाठी विशेष फायदेशीर आहे.
  • मनुका मधात मिसळून खाल्ल्यास यामुळे विवाहित पुरुषांमधील कमकुवत शुक्राणूंची समस्या दूर होते. असे मानले जाते की, मध आणि मनुका एकत्रित खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास देखील मदत होते. वास्तविक, मध आणि मनुका यांच्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतात.
  • मध आणि मनुका या दोन्हीमध्ये कर्करोगविरोधी घटक आढळतात. कर्करोगविरोधी घटक शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याचे काम करतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात. यामुळे मधात मनुके मिसळून खाल्ल्याने विवाहित पुरुषांना तसेच इतर व्यक्तींना देखील मोठा फायदा होत असतो.

Disclaimer: हा लेख सल्ल्यासह केवळ सामान्य माहिती प्रदान करतो. या लेखात दिलेली माहिती कोणताही पात्र वैद्यकीय सल्ला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: raisin is very benificial to married man
Published on: 02 March 2022, 01:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)