कोरोनासाठी प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक उपाय

09 April 2020 09:31 AM


सध्या सारे जग हे कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या महामारीमुळे पीडित आहे. अशामध्येच आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आपणास स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे कार्य करते. या रोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. सध्या कोविड-१९ या रोगावर कुठलाही खात्रिशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळेच या रोगापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे उपाय करणे योग्य ठरेल.

आयुर्वेद हे आयुष्य व आरोग्याचे विज्ञान असल्याकारणाने ते नैसर्गिक साधनांच्या वापरावर अधिक भर देते. आयुर्वेद हे मुख्यत्वे औषधी गुणधर्म असलेल्या रोपांवर आधारित विज्ञान आहे. आयुर्वेदात दिलेल्या सरळ आणि सोप्या पद्धतीद्वारे आपण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता अजून मजबूत बनवू शकतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने यासंदर्भातच श्वसन संस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्याकरिता काही उपाय सांगितले आहेत. सदरील उपाय हे आयुर्वेदातील साहित्य व संशोधनावर आधारित आहेत.

शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली वाढविण्यासाठी सामान्य उपाय

  • दिवसभर फक्त गरम पाणी प्या.
  • दररोज किमान अर्धा तास योगासन, प्राणायाम आणि ध्यान करावे.
  • दररोजच्या जेवणात हळद, जिरे, धने आणि लसुनाचा वापर करावा.

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी उपाय

  • रोज सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राश (१ चमचा) घ्यावा.
  • तुळशीची पाने, दालचिनी, काळे मिरे, सुंठ, तसेच मनुकांपासून बनविलेल्या हर्बल टीचा किंवा काढ्याचे दिवसातून किमान दोन वेळा सेवन करावे. चवीनुसार यामध्ये गुळ किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
  • अर्धा चमचा (छोट्या चमचाने) हळद १५० मिली गरम दुधात टाकून दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.

खोकला किंवा घसा खवखवणे

  • दिवसातून कमीत कमी एक वेळा पुदिन्याचे पाने किंवा ओवा टाकून पाण्याची वाफ घ्यावी.
  • खोकला किंवा घशात खवखवत असल्यास लवंगाच्या चुर्णामध्ये गुळ किंवा मध मिसळवून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
  • वरील लक्षणे कमी नाही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नोट: सदरील माहिती ही भारताच्या आयुष मंत्रालयाकडून नागरिकांच्या हितार्थ प्रसिद्ध करण्यात आलेली असून ते फक्त प्रतिबंधात्मक असून उपचार नाहीत

लेखक:
ऋषिकेश माने, गणेश गायकवाड
अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
9403129872

covid 19 covid कोविड-19 corona कोरोना आयुर्वेद ayurveda
English Summary: Preventive qyurvedic remedies for corona

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.