वैद्यकीय भाषेत या त्रासाला म्हणजेच पायांच्या नसांचे नुकसान होऊन जाणवणार्या या त्रासाला neuropathy म्हणतात. पायाची जळजळ वाढण्यासोबतच अनेकांना तळव्यांवर सूज, लालसरपणा किंवा घाम येणं अशी लक्षण देखील आढळतात.पन्नाशीच्या जवळ असलेल्यांमध्ये neuropathy चा त्रास अधिक तीव्रतेने आढळून येतो. KEM hospital चे प्रोफेसर आणि मेडिसीन डिपार्टमेंट प्रमुख डॉ. अमर पझारे यांनी या समस्येला ओळखण्यासाठी ही '8' लक्षण सांगितली आहेत.
1.व्हिटॅमिन बी12 ची कमतरता -शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हातापायांमध्ये जळजळ किंवा संवेदना कमी होण्याचा त्रास होतो. अनेकांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे चालताना त्रास होतो.2.मधूमेह -वाढत्या वयानुसार मधूमेहींमध्ये neuropathy चा त्रास अधिक वाढतो. मधूमेहींमध्ये पायात जळजळ वाढण्याचा त्रास अधिक आढळतो.3.मद्यपानाचे व्यसन -Neuropathy चा त्रास वाढण्यामागे मद्यपानाची सवय हेदेखील असू शकते.
दारूमुळे नसांच्या टीश्यूचे नुकसान होते. त्यावर मात करण्यासाठी मद्यपानाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.4.औषधोपचार -काही औषधांमधील ड्रग्ज शरीरावर दुष्परिणाम करतात त्यामुळे पायांची जळजळ वाढते. डॉ. पझारे यांच्या मते, टीबीच्या औषधांमुळे, केमोथेरपी तसेच कॅन्सरची ड्रग्ज यांमुळे पायांची जळजळ वाढू शकते.5.किडनीचे विकार -किडनीचे आजार असणार्यांमध्ये किंवा डायलिसीसवर असणार्यांमध्ये पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ जाणवते. काही वेळेस अशा रुग्णांमध्ये रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रासदेखील जाणवतो.
Published on: 21 May 2022, 08:43 IST