डाळिंब एक प्रमुख फळ आहे, याचे सेवन आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.डाळिंब मध्ये अनेक पोषक घटक असतात त्यामुळे याचे सेवन करण्याचा आहार तज्ञ सल्ला देतात. डाळिंब मध्ये अनेक व्हिटॅमिन, पोटॅशिअम, झिंक, ओमेगा, फॅट्टी ऍसिड इत्यादी पोषक घटक असतात त्यामुळे याचे सेवन मानवी आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सांगितले जाते. डाळिंब खाल्ल्याने मानवी शरीराला फायदा मिळतो तसेच यामुळे केसांचे आरोग्य सुधारते तसेच यामुळे त्वचेला एक वेगळा ग्लो प्राप्त होतो.
डाळींबाचे सेवन केल्याने एनिमिया सारख्या गंभीर आजारांपासून देखील स्वतःला वाचवले जाऊ शकते. ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरची समस्या असते त्या व्यक्तींनी डाळींबाचे सेवन केल्यास ब्लड प्रेशरच्या समस्येपासून निदान प्राप्त केले जाऊ शकते. आहार तज्ञांच्या मते डाळिंबात कॅन्सरविरोधी घटक देखील आढळतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने कॅन्सर सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण प्राप्त होते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून मानवी शरीराला वाचवले जाऊ शकते.
केव्हा खावे डाळिंब
डाळिंब मध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स असतात तसेच यामध्ये फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे रात्रीच्या वेळी याचे सेवन करणे फायद्याचे नसते. डाळिंब मध्ये असलेले पॉवरफुल घटक रात्री पचायला जड असतात. कारण की रात्रीच्या वेळी आपल्या शरीरातील मेटाबोलिजम हे खूप स्लो काम करतात, त्यामुळे शक्यतो रात्रीच्यावेळी डाळिंब खाणे टाळावे. जर आपण रात्रीच्या वेळी डाळिंब खाल्ले तर यामध्ये असलेली साखर पूर्णतः हा कन्वर्ट होऊ शकत नाही त्यामुळे देखील रात्रीच्यावेळी डाळिंब खाणे टाळावे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके डाळिंबाचे सेवन करावे तरी कधी? मित्रांनो डाळींबाचे सेवन सकाळी सकाळी केल्याने याचा आपल्या शरीराला मोठा फायदा मिळत असतो.
या पद्धतीने करा डाळींबाचे सेवन
मित्रांनो आपण एका दिवसात दोन कप डाळिंबाचे दाणे सेवन करू शकता. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात तसेच डाळिंबामध्ये कॅलरी देखील खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे याचे सेवन फायदेशीर ठरते. मित्रांनो जर आपणास डाळिंबाचे दाणे खाणे आवडत नसतील तर आपण डाळिंबाचा ज्यूस करून देखील याचे सेवन करू शकता. आपण डाळिंबाचा ज्यूस सकाळी नाश्त्यात घेऊ शकता यामुळे आपणास खूप फायदा मिळू शकतो. डाळिंब खाल्ल्याने पोटासंबंधित अनेक विकार दूर केले जाऊ शकतात. डाळींबाचे सेवन दही सोबत केल्याने यापासून आपल्या शरीराला चांगला फायदा मिळत असतो. आपणास डाळिंबाचे दाणे अथवा ज्यूस आवडत नसेल तर आपण डाळिंब मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवून ब्रेड मध्ये टाकून सेवन करू शकता.
Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagaran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Published on: 13 January 2022, 09:46 IST