डाळिंब खाने प्रत्येकालाच आवडते हे एक असे फळ आहे याचे सेवन प्रत्येकजन करत असतो, हेच कारण आहे की यावर्षी डाळिंबाला तब्बल 100 रुपये किलोपर्यंतचा रेट मिळत होता. डाळिंब सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देखील नेहमी देत असतात, डाळिंब हे मानवी शरीरासाठी खुपच फायदेशीर असते यामध्ये अनेक औषधी घटक असतात, तसेच डाळिंब खाण्यासाठी खुपच स्वादिष्ट असते. डाळिंब खाल्ल्याने शरीरात रक्ताची वाढ होते. तसेच याचे सेवन शरीरासाठी अनेक अंगाने फायदे पोहचविते. डाळिंबात इतर फळांच्या तुलनेत अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडेंट उपलब्ध असतात. डाळिंबात अनेक व्हिटॅमिन्स आढळतात जे की आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात, असे सांगितले जाते की डाळिंबाचे दाणे खाण्यापेक्षा याच्या जूसचे सेवन शरीराला अधिक फायदा पोहचविते.
याचे सेवन कुणीही करू शकतो. डाळिंब आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. मेडिकल न्यूज टुडे यांच्या एका बातमीनुसार डाळिंब खाल्ल्याने आपल्या शरीराला 10 प्रकारचे फायदे होतात, डाळिंब खाल्ल्याने आपले शरीर अनेक रोगांपासून बचावु शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया हिवाळ्यात डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.
»डाळिंब मध्ये पॉलिफिनॉलस नावाचा घटक असतो त्यामुळे त्याचा कलर लाल असतो. हे एक शक्तिशाली ऑंटीऑक्सिडेंट आहे, डाळींबमध्ये असलेल्या ह्या ऑंटीऑक्सीडेंटमुळे शरीरातील इनफ्लेमेशन कमी होण्यास मदत होते शिवाय पेशीना संरक्षण मिळते.
»डाळींबच्या ज्यूस चे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. एका डाळिंबात आपल्या शरीरासाठी लागणार्या सुमारे चाळीस टक्के विटामिन सी चे प्रमाण असते. म्हणून डाळिंब चे सेवन केल्याने आपले शरीर अनेक प्रकारचे रोगांपासून लढण्यास सक्षम होते.
»डाळिंबाची नियमित सेवन केल्याने आतड्यांमध्ये होणारी जळजळ थांबते.तसेच याच्या सेवनाने पाचन तंत्र मजबूत होते. ज्या लोकांच्या पोटात जळजळ होते किंवा ज्या लोकांना अल्सरचा त्रास असतो त्या लोकांनी डाळींबाचे सेवन करावे असा सल्ला डॉक्टर देतात.
»डाळिंब खाल्ल्याने तणाव दूर होतो त्यामुळे डाळिंबाचे नियमित सेवन केले पाहिजे
टीप :- सदर आर्टिकल मध्ये नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची कृषी जागरण पुष्टी करत नाही. या फक्त सूचना आहेत याचा उपयोग माहिती म्हणुन घ्या. असे कोणतेही उपचार/औषध/आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Published on: 18 December 2021, 10:23 IST