Health

जेवण, नाश्ता काहीही असो, आपल्या खाण्याचा अविभाज्य घटक किंवा जेवणाची चव वाढवणारी गोष्ट म्हणजे शेंगदाणे!

Updated on 16 May, 2022 12:07 PM IST

पोह्यापासून ते जेवणात लागणाऱ्या चटणी पर्यंत शेंगदाण्याचे वर्चस्व असते. याच शेंगदाण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे त्यापैकी काही आज आपण जाणून घेऊ:कंबर आणि सांधे दुखीमध्ये आराम यात पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, कॅल्शियम, लोह, सेलेनियम इत्यादी अनेक पौष्टिक घटक आढळतात.

जर हिवाळ्यात शेंगदाण्याबरोबर गुळाचे सेवन केले तर कंबर आणि सांधे दुखीमध्ये आराम मिळतो. गरिबांचे बदाम म्हणवले जाणारे शेंगदाणे!lशेंगदाण्याला गरिबांचे बदाम देखील म्हणतात. कारण ते मेंदूला शक्ती देतात आणि स्मरणशक्ती वाढवतात. शेंगदाणे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते.

तसेच, शरीरात ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो.रोग प्रतिकारक शक्ती वाढतेत्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम आणि जस्त शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

शेंगदाण्याचा सेवन रक्तातील साखर नियंत्रित करते. या गोष्टी लक्षात ठेवा!जर तुम्हाला शेंगदाण्यातील घटकांचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर ते रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी खा. भिजलेले शेंगदाणे तुम्ही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता.

English Summary: Peanuts relieve joint pain, learn many other benefits from this article!
Published on: 16 May 2022, 12:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)