योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या 5 औषधांच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने हे आदेश दिले आहेत. पतंजली समूहाच्या या औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत उत्तराखंड सरकारने ही कारवाई केली असल्याचं म्हटलं जात आहे.
कोणत्या 5 औषधांच्या उत्पादनावर बंदी: 1) बीपीग्रीट 2) मधुग्रीट 3) थायरोग्रीट 4) लिपिडोम टॅबलेट 5) आयग्रीट गोल्ड टॅबलेट पतंजली ग्रुपच्या वरील 5 औषधांचा उपयोग मधुमेह
हळद रोपवाटिका स्थापना करण्यासाठी वाचा अतीउत्तम योजना
आणि रक्तदाब असल्यास उपचारासाठी वापर व्हायचा. या आजारांवर ही औषधे प्रभावी असा दावा केला गेला होता.These medicines were claimed to be effective against these diseases. मात्र हा दावा दिशाभूल करणारा
असल्याचं प्राधिकरणाला आढळल्यानंतर पतंजली वर कारवाई केली आहे. आता या औषधांच्या उत्पादनासोबतच जाहिराती देखील बंद करण्यात येणार असल्याची माहीती आहे.
हळद रोपवाटिका स्थापना करण्यासाठी वाचा अतीउत्तम योजना
दरम्यान केरळचे के व्ही बाबू या डॉक्टरांनी पतंजलीच्या या 5 औषधां विरोधात तक्रार केली होती, यामुळे प्राधिकरणाकडून औषधांची तपासणी
झाल्यानंतर औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला. आता या 5 औषधांचं पतंजलीला परत उत्पादन सुरू करायचं असेल तर तशी परवागी घ्यावी लागणार आहे. तसेच ही कारवाई चुकीची आणि आयुर्वेदाला विरोध करण्यासाठी काहींनी मुद्दाम केल्या असल्याचं बाबा रामदेव आणि पतंजली समूहाने सांगितलं आहे.
Published on: 12 November 2022, 05:01 IST