1. आरोग्य सल्ला

पोट साफ करण्यासाठी संत्र्याची साल आहे उपयोगी

उन्हाळ्यात अनेक फळे खाल्ल्याने आपल्याला फायदा होत असतो. या फळापैकी एक फळ म्हणजे संत्रा. आज आपण या लेखात संत्रा या फळाचे फायदे जाणून घेणार आहोत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
संत्री खाण्याचे फायदे

संत्री खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात अनेक फळे खाल्ल्याने आपल्याला फायदा होत असतो. या फळापैकी एक फळ म्हणजे संत्रा. आज आपण या लेखात संत्रा या फळाचे फायदे जाणून घेणार आहोत.

  • संत्रा हे एक एक शक्तीवर्धक फळ आहे. संत्र्याचा एक ग्लास रस शरीर आणि मन थंड करते, थकवा आणि तणाव दूर करते, हृदय आणि मेंदूला नवीन जोम आणि ताजेपणा देते. संत्र अनेक विकारांवर रामबाण उपाय आहे.संत्र्याचं सेवन केल्यानं. थंडीपासून बचाव होईल. संत्रामध्ये असलेले व्हिटॅमिन सी सर्दी दूर ठेवण्यास मदत करते. असेही म्हणतात की सर्दी झाल्यावर हे फळ खावे,

  • यासोबत कोरडा खोकला दूर करण्यासदेखील संत्री मदत करते.

  • संत्र हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते.

  • संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ‘क’, लोह आणि पोटॅशियम असतं.

  • संत्र्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये फ्रुक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन्स असतात आणि हे शरीराला लगेच ऊर्जा देण्याचे काम करते.

  • संत्र्याचा एक ग्लास रस संपुर्ण शरिराला रिलॅक्स करतो. यामुळं आपला तणाव आणि थकवा दूर होतो.

  • पोट साफ न होण्याची समस्या असेल तर संत्र्याच्या रसामध्ये बकरीचे दूध मिसळुन प्यायल्यास खुप फायदा मिळतो.

  • संत्र्याचे नियमित सेवन केल्याने मूळव्याधाची समस्या दूर होते. रक्तस्राव थांबवण्याची क्षमता यामध्ये आहे.

  • खुप ताप असेल तर रुग्णाला संत्र्याचा रस दिल्याने तापमान कमी होते. यात असलेले सायट्रिक आम्ल हे मूत्र रोग आणि किडनीच्या आजारांना दूर करते.

  • हृदयरोग असलेल्या लोकांना संत्र्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून दिल्याने आश्चर्यकारक फायदे दिसून येतात.

  • संत्र्याचे नियमित सेवन केल्याने दात आणि हिरड्या चांगल्या राहतात. दात पांढरे होतात आणि तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या दूर होते.

  • संत्र्यामध्ये अँटीऑक्सीडंट्स अधिक प्रमाणात असतात जे कँसरच्या प्रभावाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. कँसरपासुन बचाव करण्यासाठी नियमित संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने फायदा होतो.

  • पोटातील गॅस, अपचन, जॉइंट पेन, उच्च रक्तदाब या रोगांसाठी हे रामबाण उपाय आहे.

  • गरोदर महिला किंवा यकृतचा रोग झालेल्या महिलांसाठी संत्र्याचा ज्यूस खुप फायदेशीर असतो.

  • गरोदर काळात याचं नियमित सेवन केल्यानं प्रसव वेदनांत आराम मिळतो. यासोबतच बाळाचं आरोग्य खुप चांगलं राहतं.

  • संत्र्याची साल वाळवून त्याचे चूर्ण तयार करा आणि हे चूर्ण गुलाब जल किंवा दूधात टाकुन चेह-याला लावल्यानं चेहरा स्वच्छ होतो आणि पिंपल्स दूर होतात. ब्लॅकहेड्स आणि सावळेपणा दूर होतो.

  • संत्र्याचं ताजं फूल बारीक करुन त्याचा रस केसांना लावल्यानं केसांची चमक वाढून केस काळे आणि घनदाट होतात.

 

English Summary: Orange peel is useful for cleansing the stomach Published on: 17 March 2021, 09:01 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters