आजची,उद्याची आणि मग परवाचीही सोय करण्यात सारे आयुष्य निघून जाते.पूर्वी कसेही करून घरातल्याना पोट भरेपर्यंत जेवण मिळावे हा मुख्य उद्देश प्रत्येकासमोर असे.पुढे शिक्षण,व्यापार व आर्थिक बाबतीत बरेच संशोधन होऊन प्रत्येक जण बऱ्यापैकी कमवू लागला.पोटभर जेवू लागला.घरी मजा येत नाही म्हणून बाहेर हॉटेलला वगैरे जावू लागला.आरोग्यासाठी हितकर पदार्थ सोडून चवीसाठी खाऊ लागला आणि बघताबघता पोटाचा नगारा वाढू लागला.आता सध्याचे पाहाल तर अनेकांना पोट भरण्याची चिंता नसून खाऊन खाऊन वाढलेल्या पोटाला कमी करण्याची चिंता लागलेली आहे.आणि यासाठी सर्वकाही करायला माणूस तयार आहे.अगदी कितीही व्यायाम करायला तो मागे पुढे बघत नाही.अनेकजण जिमला जातात पण तिथेही ट्रेनर्संचे एक्सरसाईज प्रोग्रॅम धुडकावत फक्त पोटाच्या व्यायामासाठी हट्ट करतात.कित्येकांना "मला एक तास फक्त पोटाचा व्यायाम करायचा आहे, माझी बाकी बॉडी बरोबर आहे,किती दिवसात हे पोट कमी कराल ?"असे विचारत जिमला प्रवेश घेताना मी पाहिले आहे.मित्रहो कदाचीत आपलेही विचार असेच असतील तर एक सत्य आपण समजून घेतले पाहिजे.हे कटूसत्य जरा पचायला जड जाईल पण नाविलाज आहे.
हे कटूसत्य म्हणजे एखाद्या ठरावीक भागातील चरबी कमी करणे (spot reduction ) व्यायामाने शक्यच नाही.शरीरशास्रनुसार आपण एखाद्या स्नायुचा व्यायाम केला असता त्यासाठी लागणारी ऊर्जा शरीरातील कुठल्याही भागातून वापरली जाऊ शकते.म्हणजे दंडाचा व्यायाम केला किंवा छातीचा व्यायाम करत असताना लागणारी ऊर्जा मांडीच्या किंवा पोटाच्या स्नायूमधून वापरली जाऊ शकते.एक अतिशय महत्वाचे सांगतो,आपले शरीराचे वाढणे व कमी करणे हे एखाद्या फुग्याप्रमाणे असते.उदा.एखाद्या फुग्यामध्ये जर हवा भरली तर फुगा आपल्या मूळ अकारातच फुगून मोठा होतो.म्हणजे फुग्याचा आकार गोल असेल तर फुगून ती गोलच होईल.जर फुगा लांबट असेल तर त्याच आकारात तो फुगून मोठा होईल.अगदी असेच असते आपल्या शरीराचे.जोपर्यंत आपण बारीक असतो तोपर्यंत आपले आपल्या शरीराच्या ठेवणीवर विशेष लक्ष नसते.म्हणून पुढे आपल्या लक्षात येत नाही.पोट व वजन खूप वाढले की आपले शरीर असे कधीच नव्हते असेच आपल्याला वाटत राहते.म्हणून जेव्हा पोट घटवण्याचा विचार नक्की होतो माझे फक्त पोटच वाढले आहे तेवढेच कमी करायचे असा विचार मनात येणे स्वाभाविक आहे.मात्र असे होत नाही हेही तितकेच सत्य आहे.पोटाचा व्यायाम करताना एकतर मान व डोके वर उचलावे लागते नाहीतर पाय किंवा कंबरेखालचे शरीर वर उचलावे लागते.डोक्याचा व मानेला वर उचलून जास्त हालचाली केल्या तर मानेच्या संबंधित विकार जडतात तसेच कंबरेच्या जास्त हालचाली करून कंबरेचे विकार जडतात.बरं फार व्यायाम करून पोट जराही कमी होत नाही.म्हणजे फायदा होईलच याची काहीही खात्री नाही पण नसलेले विकार होतील हे शंभर टक्के शक्य आहे.म्हणून नुसत्या पोटाच्या मागे न लागता सर्व शरीराचा व्यायाम करावा.
असे केल्याने पोट तर कमी होतेच त्याचबरोबर इतर स्नायुसुद्धा बळकट होऊन छान आकारात येतात.फक्त एवढेच लक्षात असुद्या,वजन घटवायचे असो वा वाढवायचे असो आहार हेच मुख्य औषध आहे.आहारात थोड़ा जरी बदल केला तरी त्याचा वजनावर फार परिणाम होतो.आणि वजन वाढताना ते कुठून वाढेल है सांगणे जरा कठिनच.पन सुरवात पोटापासुनच होते हे सत्य नाकारता येत नाही.प्रथम पोट वाढिस लागते मग कंबरेचे टायर्स मोठे होत जातात, आणि इथपर्यंत जर जिभेवरचा ताबा राहीला नाही तर मग लवकरच शरीर अगदीच ओबड धोबड़ होउंन बसते. म्हणून पोट सुटने ही वजन वाढीची सुरवात असते.जरा जरी पेन्ट टाइट होऊ लागली की लगेचच आहार मर्यादित करावा, (उपासमार करुंन घेऊ नये) वाकिंग सुरु करावे.म्हणजे थोड़ेफार जे वाढले आहे ते महिन्याभरातच सहज कमी होउंन जाते.मात्र आपन जर पोटाचा नगारा होईपर्यंत वाट पाहात रहाल आणि मग विचार कराल की आता पोट कमी करू तर मित्रांनो यात तुम्हाला किती यश मिळेल सांगता येत नाही.कारण पोट वाढताना कम्बरेवर प्रचंड तान पडत असतो.कंबरेचे दुखणे सुरु व्हायला लागलेले असते त्यामुळे व्यायामाला मर्यादा येतात.पोटभर जेवनाची (शरीराला गरज नसताना सुद्धा )सवय पडलेली असल्याने जास्त काळ कमी खाने जमत नाही.त्यामुळे डायट वैगेरे जास्त काळ टिकत नाही.पोट वाढतच जाते आणि सोबत अनेक विकार जडत जातात आणि चाळीशीतच वार्ध्यक्य येऊन ठेपते.म्हणून पोट वाढत आहे असे वाटले की लगेच ते कमी करण्यासाठी प्रयत्न करा. आणि एकदाचे कमी झाले की मग ते वाढनार नाही याची काळजी घ्या.
पोटाचे मसल टोन करण्यासाठी क्रंचस, रिवर्स क्रंचस, प्लेंक असे प्रकार प्रथम ट्रेनर्स कडून शिकून घ्या आणि आठवडयातुन दोन दिवस करा. लक्षात असुद्या, जेवढे पोटाचे मसल टोन असतील तेवढे कंबरदुखी पासून आपण लांब रहाल.
संपर्क - वेलनेस कन्सल्टंट
दत्ता गायकवाड
98212 34080
Published on: 29 December 2021, 10:12 IST