नमस्कार मित्रांनो, आज आपण कांद्याचा रस आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ह्याविषयीं जाणुन घेणार आहोत. कांदा हा आपल्या आहारातील एक महत्वाचा पदार्थ आहे. कांदा मसाला म्हणून देखील वापरला जातो तसेच स्वाद वाढवण्यासाठी ह्याचा मोठ्या प्रमाणात भाजीत वापर केला जातो, तसेच कांदा हा सलाद म्हणुन कच्चा देखील खाल्ला जातो
कांदा हा फक्त आहाराचा स्वादच नाही वाढवीत तर ह्याचे सेवन शरीरासाठी देखील फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. कांदा हा आयुर्वेदिक असतो आणि त्यांचा वापर हा अनेक आयुर्वेदिक औषधमध्ये केला जातो. कांद्या मध्ये अनेक पोषक तत्वे असतात, तसेच व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई देखील कांद्यात असतात त्यामुळे ह्याचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. कांद्यामध्ये मॅग्नेशियम, फॉसफरस, बीटा कॅरोटीन सारखे अनेक पोषक घटक असतात त्यामुळे याचे सेवन करण्याचा डॉक्टर नेहमी सल्ला देत असतात. अशा पोषकतत्वेयुक्त कांद्याचा रस शरीरासाठी खुप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. चला तर मग जाणुन घेऊया कांद्याचा रस पिल्याचे आश्चर्यकारक फायदे.
कांद्याचा रस हा खुप थंड असतो म्हणुन ह्याचे उन्हाळ्यात सेवन खुपच फायदेशीर असते असे असले तरी जळजळ दूर करण्यासाठी कांद्याच्या रसाचाही खूप उपयोग होतो.
याचे कारण असे की कांद्याच्या रसामध्ये वेदनाशामक असते जे वेदना कमी करणारे आणि दाहक-विरोधी असते. अशा स्थितीत कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने सूज आणि वेदना या दोन्ही समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.हिवाळ्यात ह्याचे लिमिटेड प्रमाणात सेवन केले तर अनेक फायदे होतात. म्हणून ह्याचे प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. म्हणून आज आपण जाणुन घेऊया कांद्याचा रस पिण्याचे फायदे
»मित्रांनो असे सांगितलं जाते की, कांद्याचा रस डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांद्याच्या रस पिल्याने काय फायदे होतात यासंबंधीचे एक संशोधनही करण्यात आले होते त्यानुसार असे समजले की, कांद्याच्या रसाच्या सेवनाने माणसाची कमी होणारी दृष्टी वाढू शकते.
»ह्या धावपळीच्या दिवसात अनेक लोकांना झोपेची समस्या भेडसावत असते अशा लोकांनी कांद्याचा रस पिला पाहिजे जेणेकरून त्यांची हि समस्या कमी होण्यास मदत होईल. असे सांगतात की, कांद्याच्या रसामध्ये शामक गुणधर्म असतात,
हे गुणधर्म मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळे कांद्याचा रस हा निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
»मित्रांनो अनेकदा मार लागला की ती जागा हि सुजते अशा परिस्थिती मध्ये कांद्याचा रस जर सेवन केला तर सूज हि दुर होऊ शकते. मित्रांनो कांद्याच्या रसामध्ये वेदनाशामक घटक असतात जे वेदना कमी करणारे असतात तसेच दाहक-विरोधी असतात. त्यामुळे कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने सूज आणि वेदना या दोन्ही समस्या दूर होऊ शकतात.
टीप :- सदर आर्टिकल मध्ये नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची कृषी जागरण पुष्टी करत नाही. या फक्त सूचना आहेत याचा उपयोग माहिती म्हणुन घ्या. असे कोणतेही उपचार/औषध/आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Published on: 21 November 2021, 08:58 IST