Health

आपण आपल्या आहारात कांद्याचे नियमित सेवन करत असतो, कांद्याचे सेवन आपण मुख्यता भाजीद्वारे शिजवून करत असतो तसेच सलाद म्हणून कच्चे कांदे देखील सेवन करत असतो. आहारतज्ज्ञांच्या मते, शिजून कांदे खाण्यापेक्षा कच्चे कांदे खाल्लेले आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. मात्र अनेकजन कच्चा कांदा खात नाहीत. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की कच्चे कांदे खाल्ल्याने आपल्या शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.

Updated on 30 December, 2021 7:01 PM IST

आपण आपल्या आहारात कांद्याचे नियमित सेवन करत असतो, कांद्याचे सेवन आपण मुख्यता भाजीद्वारे शिजवून करत असतो तसेच सलाद म्हणून कच्चे कांदे देखील सेवन करत असतो. आहारतज्ज्ञांच्या मते, शिजून कांदे खाण्यापेक्षा कच्चे कांदे खाल्लेले आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. मात्र अनेकजन कच्चा कांदा खात नाहीत. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की कच्चे कांदे खाल्ल्याने आपल्या शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.

कच्चा कांदा शरीरासाठी खूपच फायदेशीर

डायबिटीस असलेल्या पेशंटसाठी गुणकारी

आहार तज्ञांच्या मते डायबिटीज असलेल्या पेशंटने कच्च्या कांद्याचे सेवन केले पाहिजे, कांद्याचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. कांद्याचे नियमित सेवन डायबिटीस टू टाईप असलेल्या रुग्णांसाठी विशेष महत्त्वाचे ठरते, याचे सेवन फास्टिंग ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते.

हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर

जर आपले सांधे दुखत असतील तर याचे प्रमुख कारण आपले हाडे ठिसूळ असणे हे असू शकते. म्हणून ज्या व्यक्तींचे सांधे दुखत असतील त्यांनी कच्चे कांदे खाणे आवश्यक आहे यामुळे बोन डेन्सिटी वाढते आणि बोन डेन्सिटी वाढल्याने हाडे मजबूत होतात.

अनेक गंभीर आजारांपासून करते संरक्षण

कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने एक नाही तर अनेक आजारांसाठी फायदा होतो. कच्च्या कांद्यामध्ये दाहक-विरोधी, जंतुनाशक, प्रतिजैविक आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यामुळे याचे सेवन आपल्यासाठी एक संरक्षण भिंत म्हणून कार्य करते तसेच कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई मोठ्या प्रमाणात आढळतात.  हे सर्व पोषक घटक आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात.

सूज असल्यास उपयोगी

कांद्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म असल्याचे सांगितले जाते, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. म्हणून ज्या व्यक्तींना सूज असेल त्यांनी कांद्याचे अवश्‍य सेवन केले पाहिजे. यासोबतच कांद्याचे सेवन हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते तसेच कांद्याचे नियमित सेवन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: onion is very benificial for human body
Published on: 30 December 2021, 07:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)