Health

आपल्या आहारामध्ये कोबी हा असतोच मग ते मंचुरीयन भजी असो किंवा चायनीजमध्ये असो. सध्या स्ट्रीट फूडमध्ये सुद्धा कोबी चा समावेश हा ठरलेला असतोच जे की सॅलड म्हणून वापरले जाते. आपण कोबीची भाजी तर खात तर असतोच पण आत्ता तोच कोबी सॅलड असो किंवा सूप अथवा चायनीज असो यामध्ये वापरला जातो. अनेक असे लोक आहेत ज्यांना कोबी आवडत नाही त्यामुळे ते फेकून देतात किंवा खाणे टाळतात. पण कोबीची आपल्या आरोग्यास किती फायदे आहेत ते आज आपण पाहणार आहोत.

Updated on 07 February, 2022 7:14 PM IST

आपल्या आहारामध्ये कोबी हा असतोच मग ते मंचुरीयन भजी असो किंवा चायनीजमध्ये असो. सध्या स्ट्रीट फूडमध्ये सुद्धा कोबी चा समावेश हा ठरलेला असतोच जे की सॅलड म्हणून वापरले जाते. आपण कोबीची भाजी तर खात तर असतोच पण आत्ता तोच कोबी सॅलड असो किंवा सूप अथवा चायनीज असो यामध्ये वापरला जातो. अनेक असे लोक आहेत ज्यांना कोबी आवडत नाही त्यामुळे ते फेकून देतात किंवा खाणे टाळतात. पण कोबीची आपल्या आरोग्यास किती फायदे आहेत ते आज आपण पाहणार आहोत.

कोबी खाण्याचे फायदे :-

१. दुधामध्ये जेवढया प्रमाणत लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते तेवढ्याच प्रमाणत कोबीमध्ये सुद्धा असते. शरीरातील सर्व समस्यांवर कोबी हा उपयुक्त ठरतो.

२. तुमच्या दररोजच्या आहारात जर कोबीची थोडे प्रमाण असेल तर तुमच्या अपचन तसेच पोटदुखी सारख्या समस्यांना आराम मिळेल. आपली पचनशक्ती चांगली बनवण्यासाठी कोबी मदत करतो त्यामुळे आपले पोट ही साफ होते आणि आपल्याला आजार ही होत नाहीत. पोटाच्या जेवढ्या समस्या आहेत त्यावर कोबी हा गुणकारी आहे. पोट साफ नसेल तर जंत होतात त्यावरही कोबी गुणकारक आहे.

३. ज्यांना लठ्ठपणा ची समस्या आहे आणि त्यांना आपले वजन जर कमी करायचे असेल तर त्यांनी आपल्या आहारात कोबी चा समावेश करावा. आपण जो कोबी शिजवतो त्यामध्ये ३३ कॅलरीज असतात त्यामुळे आपल्या शरीरास ऊर्जा देखील मिळतेच पण त्याचबरोबर शरीरातील चरबी सुद्धा कमी होते. तुम्ही कोबी हा सूप, सॅलड तसेच भाजीच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकता.

४. कोबी हा फळभाजीमध्ये पोटॅशियम तसेच लोहाचे प्रमाण असते जे की आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते तसेच शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती भरून काढते. आपला रक्तदाबाशी कोणत्या समस्या असो किंवा हृदयाच्या कोणत्या समस्या असो त्या समस्यांना दूर करण्यासाठी तुम्ही कोबी खाणे गरजेचे आहे.

५. शरीरातील स्नायू दुखत असतील तर तुम्ही कोबी खाणे गरजेचे आहे कारण कोबीमध्ये लॅक्टिक ऍसिड नावाचा घटक असतो जो तुमच्या वेदनादायी समस्यांना आराम देतो. तसेच कोबीमध्ये पॉलिफेनोल्स नावाचा एक घटक असतो जो हृदयसंबंधी ज्या समस्या असतील त्या दूर ठेवतो.

६. कोबीमध्ये व्हिटॅमिन के असते जे आपल्या मेंदूच्या नसा सुधरवण्याचे काम करते आणि मेंदूला ही ऍक्टिव्ह बनवते. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची ची पातळी कमी करण्यास कोबी मदत करतो.

English Summary: OMG There are so many benefits to eating cabbage
Published on: 07 February 2022, 07:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)