आपन आपल्या घराभोवती मोकळ्या जागेत केलेल्या भाजीपाला पिकांच्या लागवडीस परसबाग असे म्हणतात. कुटूंबाच्या पोषणविषयक गरजा भागविण्यासाठी परसबागेमध्येच विविध जिवन सत्वे उपलब्ध होणारी फळझाडांची लागवड केलेल्या परसबागेत पोषक परसबाग (Nutritional Garden) असे म्हणतात. ह्या पध्दतीत स्वतःच्या कुटूंबाला दररोज लागणाऱ्या आणि शरीरास आवश्यक असणाऱ्या आवडणाऱ्या सेंद्रिय भाजीपाला पिकांची लागवड केल्या जाते.आहारतज्ञाच्या शिफारशीनुसार दर माणसी २८० ग्रॅम भाजीपाला व १२० ग्रॅम फळांची शरीराला गरज असते, परंतु हाच दर आपल्या देशात १२० ग्रॅम भाजीपाला व ४० ग्रॅम फळे इतका आहे. त्यामुळे परिसरातील ह्या पोषक परसबागेचे योग्य नियोजन केले तर शरीरासाठी आवश्यक असलेले जिवनसत्वे, क्षार, कर्बपदार्थ व प्रथीने उपलब्ध होवू शकतात. एकुण २० x २० चौरसमीटरच्या बागेतुन कुटूंबातील सहा सदस्यांना वर्षभर भाजीपाला मिळू शकतो. पोषक परसबागेचे उद्दीष्टे :ताज्या, विषमुक्त फळे व फळभाज्या, पालेभाज्याचा दैनंदिन आहारात उपयोग करुन समतोल आहार घेणे.परसातील मोकळी जागा व सांडपाणी ह्यांचा सुयोग्य वापर करणे. कुटूंबातील सहज स्वस्त पध्दतीने सुरक्षित भाजीपाला व फळांची उपलब्धता करणे.
पोषक परसबागेचे फायदे : थोड्या जागेत जास्त काळजीपुर्वक मशागत करुन भाजीपाला पिकांची लागवड केल्यास आपल्या कुटूंबाला समतोल आहार निळातो, फळे आणि भाजीपाल्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि खनिज असतात त्या फळांची व भाज्यांची घरच्या घरी लागवड केल्यास ती विकत घ्यावी लागत नाहीत आणि बाहेरीत किटकनाशक फवारलेली व कृत्रीमरीत्या पिकविलेली महागडी फळे व भाजीपाल्यापासुन होणारे दुष्परिणाम टाळून पैशांची बचत होते. त्यासोबतच आपल्या कुटूंबाला ताज्या आणि उत्तम प्रतीच्या भाज्या आणि फळे मिळतात. आपल्या कुटूंबाला लागणारी भाजी आणि फळे आपणच तयार केली आहेत ह्याचा आंनदही वेगळाच असतो. घरातील लहान मोठ्यांना फावल्या वेळेचा सदुपयोग करुन श्रमाचे महत्व कळते विविध भाज्या फळझाडे ह्यामुळे घरातील कुटूंबांचे आरोग्य सुदृढ होवून प्रतिकारशक्ती वाढीस लागते व पर्यायाने डॉक्टरवर होणाऱ्या खर्चात कपात होते.परसबागेसाठी आवश्यक घटक : परसबागेसाठी आखणी करतांना उपलब्ध क्षेत्र, जमिनीचा प्रकार, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, हवामान आणि हंगाम ह्या घटकांचा प्रामुख्याने विचार करावा.परसबागेसाठी मध्यम निचऱ्याची जमिन आवश्यक आहे. जर जमिन अत्यंत हलकी असेल तर १५-२० से. मी. उंचीचा थर पोयटा मातीने बदलवून घ्यावा व संपुर्ण जमिन समपातळीत करुन घ्यावी.
पाणी :परसबागेसाठी पुरेसे पाणी असल्यास फार उत्तम तसेच यांच्याकडे पाण्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसेल त्याना आपल्याकडे असणाऱ्या सांडपाण्यावरसुध्दा परसबागेचे उत्तम नियोजन करते येते. बऱ्याच भाजीपाला पिकांचे उत्पादन सव्वा ते दिड | महिन्यात सुरु होत असते. त्यामुळे यांच्याकडे पाणी नसेल, परंतु जागेची उपलब्धता असेल त्यांनाही जुन ते सप्टेंबरपर्यंत परसबागेची आखणी करता येईल. परसबागेचे नियोजन प्रथम जागेची आखणी करतांना शक्यतोवर चौकोनी पध्दतीचा बाग आखावा. आखणी तर बागेची जमिन चांगली उखरुन घ्यावी. उखरी १५ ते २० सें.मी. खोल घ्यावी. कडक किंवा दगड गोट्यांचा समावेश असणारी असेल तर १५ ते २० सें.मी.चा नदीकाठच्या गाळाच्या मातीचा थर दयावा, त्यामध्ये प्रती चौरस मीटर १ टोपले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळवून घ्यावे. परसबागेची जमिन तयार झाल्यानंतर | बागेच्या कुपणाची सोय करावी. तारेचे कुंपण केल्यास त्यावर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करता येते. सजिव कुंपणाचा विचार केल्यास मेहंदी / करवंदाचा विचार करावा. सर्वसामान्यपणे घराच्या उत्तरेला जास्त काळ सावली राहते. ह्या भागात सावलीत येणाऱ्या पालेभाज्यांची लागवड करावी. पुर्व पश्चिम आणि दक्षिणेकडील भागाला बराच काळ सुर्यप्रकाश आणि उबदार तापमान मिळते. ह्या ठिकाणी फळझाडे आणि फळभाज्यांची लागवड करावी. जेणेकरुन वारा प्रतिरोधके म्हणुन ही फळझाडे उपयोगी पडू शकतात. पालक, आंबटचुका, कोथींबीर, चाकवत इत्यादी पालेभाज्यांची लागवड सरींच्या वरंब्यावर, टोमॅटो, मिरची वांगी ह्या पिकात आंतरपीक म्हणुन सुध्दा करता येते. मुळा, गाजर, बीट ह्यासारखी मुळवर्गीय भाजीपाल्याची पिके वाफ्यांमध्ये जे वरंबे असतात त्या वरंत्र्यावर घेता येतात.
फळभाजीपाल्याची लागवड दोन पध्दतीने केली जाते. वांगी, मिरची टोमॅटो, कोबी, पानकोबी अशा भाज्यांची रोपे तयार करुन त्यांचे स्थलांतर केले जाते, तर गवार भेंडी, मिरची तसेच वेलवर्गीय भाज्या आणि पालेभाज्या ह्यांची लागवड बियांपासुन करतात. ह्याला लागणाऱ्या पाण्याच्या पुर्ततेसाठी घरातील तांदूळ, डाळी, भाज्या धुतलेले पाणी तसेच भांडी धुतलेले पाणी देखील झाडांसाठी वापरु शकतो.मशागत : परसबागेतील जमिनीची लागवडीपुर्वी मशागत करणे आवश्यक असते. त्यालाच पुर्व मशागत असे म्हणतात.पुर्वमशागत करण्यासाठी वेगवेगळी अवजारे वापरुन जमिनी खोलवर मऊ आणि भुसभुशीत करावी. पुर्वीच्या पिकांचे अवशेष काढून टाकावेत. जमिन समपातळीत करणे किंवा तिला विशिष्ट बाजुस उतार देणे ही कामे करुन घ्यावीत. पिकवाढीच्या काळात दोन ओळीतील माती हलवून तणे काडून टाकावीत. या मशागतीसाठी कुदळी, फावडे, दातेरी कोळपे, खुरपे, हातपंजे, घमेले ह्या अवजारांचा वापर करावा. बागेसाठी वापरावयाची हत्यारे काम झाल्यानंतर स्वच्छ करावीत म्हणजे ती गंजणार नाहीत, तसेच अवजारांमार्फत रोगाचा प्रसार होणार नाही. बागेत काम करण्यासाठी उभ्याने काम करता येईल अशी अवजारे निवडावीत त्यामुळे श्रम कमी लागतात. बियाणे :दुकानात चांगल्या जातीवंत बियाण्यांचे पाकीटे मिळतात. बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेली असते. एकदल वर्गीय भाजीपाल्यास अॅझोटोबॅक्टर व ह्या बियाण्यास ॲझोस्पीरीलम आणि व्दिदलवर्गीय (शेंगवर्गीय) भाजीपाल्यास रायझोबियम जिवाणू संवर्धक चोळल्यास पिकास फायदा होतो. परसबागेत लागवडीसाठी बियाणे अतिशय अल्प प्रमाणात लागते.
कृषि सेवा केंद्रावर किरकोळ विक्रीकरीता बियाणे उपलब्ध असते, तसेच नजीकच्या कृषि विज्ञान केंद्रामध्ये अगोदर मागणी नोंदविल्यास तेथे खात्रीचे संपुर्ण बियाणे किट उपलब्ध होवू शकते. काही भाजीपाल्याचे बी घरच्या घरी तयार करता येते फक्त संकरीत वाणाचे बी किंवा तयार रोपे खरेदी करावीत. परसबागेत वेळोवेळी लागवड करतांना दाटीवाटीने लागवड न करता, बटाटा, कांदा, कोबी, फुलकोबी ह्यासारखी एकाच वेळी निघणारी भाजी टाळावी. दररोज लागणाऱ्या पालेभाज्यांचा अग्रक्रमाने समावेश करावा.जसे एकाच प्रकारची भाजी न लावता ४ ते ५ प्रकारच्या भाज्यांची लागवड करावी. परसबागेत रोपे स्थलांतर करतेवेळी ती निरोगी जोमदार ३ ते ४ आठवड्यांची,१५ ते २० सें.मी. उंच व ४ ते ६ पाने असणारी असावीत रोपे वाफ्यातुन किंवा ट्रेमधुन काढण्यापूर्वी २४ तास आधि वाफ्याला / ट्रेला पाणी दयावे, म्हणो रोपे अलगद उपटून काढता येतील. वाफ्यातील रोपे काढण्यासाठी लांब सळई खुपप्याचे टोक किंवा ट्रा सप्लँटींग टॉवेलच्या मदतीने रोपे अलगद उपटून काढावीत. मातीच्या गोळ्यासहीत रोपे काढल्यास मुळ्यांना इजा होणार नाही. ढगाळ हवामान असताना किंवा संध्याकाळच्या वेळी पुर्नलागवड करावी व लगेच पाणी दयावे. अशा रितीने वांगी, मिरची, टोमॅटो, कांदा कोबी, फ्लावर इ. ची रोपे तयार करुन लावू शकतो. हंगामानुसार भाजीपाला लागवड :भाजीपाला लागवडीसाठी हंगामाप्रमाणे योग्य भाज्यांची लागवड करावी.
डाॅ प्रणिता कडु (काकडे) MSc,M.a,B.ed,phD विषय विशेषज्ञ गृह विज्ञान कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती माहिती संकलन. मिलिंद जि गोदे save the soil all together
Published on: 11 June 2022, 01:33 IST