आपण अनेक पदार्थांमध्ये जायफळचा (Nutmeg) वापर करत असतो, जायफळचा वापर आपण केवळ मसाला पदार्थ म्हणूनच करत असतो. पण आज आपण एक चिमूटभर जायफळचे सेवन केल्याने आपल्या शरीराला मिळणारे आश्चर्यकारक फायदे जाणून घेणार आहोत. जायफळ मध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे (Nutrients) असल्याचे सांगितले जाते, जे की आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी तसेच अनेक रोगांपासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे असतात. मित्रांनो तसे बघायला गेल तर जायफळ एक सुगंधित मसाला पदार्थ (Aromatic spice foods) आहे आणि याचा वापर अनेक पदार्थ बनवतांना केला जातो.
मित्रांनो आपणास जाणुन आश्चर्य वाटेल की जायफळ फक्त आपल्या पदार्थांची चवच नाही वाढवत तर ते आपल्या आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर ठरते. जायफळ या मसाल्याच्या पदार्थाचा उपयोग प्राचीन काळापासून शारीरिक आणि मानसिक आजारांपासून निदान मिळवण्यासाठी केला जात आहे. आयुर्वेदामध्ये (Aayurveda) जायफळला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, जायफळमध्ये मॅग्नेशियम, मॅगनीज, कॉपर यांसारखे खनिज आढळतात तसेच यामध्ये अनेक विटामिन्स (Vitamins) देखील आढळतात. यामुळे जायफळचे सेवन आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे देऊन जाते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया जायफळ सेवनाचे आपल्या शरीराला होणारे फायदे.
वेदनाशामक म्हणुन काम करते (Acts as an analgesic)
जायफळमध्ये मायरीस्टिसिन, इलेमायसिन, युजेनॉल आणि सॅफ्रोल सारखे आवश्यक घटक मोठ्या प्रमाणात असतात. जायफळ मध्ये असलेले हे घटक सांधेदुखी, सूज आणि जळजळ दूर करण्यास मदत करते. याशिवाय जायफळ जळजळ कमी करण्यास देखील मदत करते आणि यामुळे नसा चांगल्या प्रकारे कार्य करतात.
निद्रानाश दूर करण्यास मदत करते (Helps to eliminate insomnia)
जायफळमध्ये हिलिंग गुणधर्म असतात ज्यामुळे नसाना आराम मिळतो. जायफळ मधील शक्तिशाली औषधी गुणधर्म नसा शांत करण्यास आणि सेरोटोनिन सोडण्यास मदत करतात, ज्यामुळे झोप चांगली लागते. आयुर्वेदानुसार, एका ग्लास दुधात चिमूटभर जायफळ टाकून प्यायल्याने झोपेची स्थिती सुधारण्यास मदत होते.
पाचन तंत्र सुधारण्यास मदत करते (Helps to improve the digestive system)
आपण करी, सूप आणि इतर पेय पदार्थात चिमूटभर जायफळ टाकून सेवन केलेतर यामुळे तुमची पचनक्रिया सुधारू शकते. याव्यतिरिक्त, जायफळ पाचक एंझाइम्सच्या स्रावमध्ये मदत करते जे चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे ज्या लोकांना पोटासंबंधित विकार असतात किंवा पचन व्यवस्थित होत नसेल त्या लोकांनी जायफळचे आवर्जून सेवन करायला हवे.
Published on: 31 December 2021, 08:33 IST