आता केंद्र सरकार विविध आजारावर उपचार घेत असलेल्यांना आयुष्मान कार्ड देणार आहे ज्याच्या मदतीने आता सरकार 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देणार आहे.
या योजनेंतर्गत सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जात आहेत. या योजनेसाठी कार्ड मोफत केले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आम्ही तुम्हाला त्याच्या नोंदणीसाठी पात्रतेबद्दल सांगत आहोत. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mera.pmjay.gov.in नावाच्या अधिकृत साइटला भेट द्या. यानंतर तुमचा मोबाईल नंबर भरा. स्क्रीनवर दिसणारा कोड एंटर करा.
कपिल जाचक यांना केळीरत्न पुरस्कार, अधिक उत्पादन घेतल्याने परिषदेकडून सन्मान..
यानंतर OTP पर्यायावर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाका. त्यानंतर तुमचे राज्य निवडा. यानंतर मागितलेली सर्व माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला कळेल.
तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास, तुम्ही जवळच्या CAC केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर सुमारे 10 ते 15 दिवसांनी तुमचे आयुष्मान कार्ड बनवले जाईल. यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.
कपिल जाचक यांना केळीरत्न पुरस्कार, अधिक उत्पादन घेतल्याने परिषदेकडून सन्मान..
यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड , पत्त्याचा पुरावा, मोबाईल नंबर हे आवश्यक आहे. 14555 आणि 1800 111 565 या क्रमांकावर तुम्ही यासंबंधी सर्व माहिती मिळवू शकता. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला 5 लाख रुपयांचा आरोग्य लाभ मिळतो.
उन्हाळ्यात काकडीच्या शेतीतून चांगले पैसे कमवा, काकडी शेतीची योग्य पद्धत जाणून घ्या
शेतकऱ्यांनो खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना
आता कृषी अधिकाऱ्यांनी गरज नाही, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ड्रोनमधून होणार ई- पंचनामे...
Published on: 25 April 2023, 05:22 IST